दिनांक 21 January 2018 वेळ 4:25 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मलवाडा ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनलचा ऐतहासिक विजय सरपंचपदासह 9 जागांवर निर्विवाद वर्चस्व

मलवाडा ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनलचा ऐतहासिक विजय सरपंचपदासह 9 जागांवर निर्विवाद वर्चस्व

प्रतिनिधीMALWADA GRAMPANCHAYAT FINAL
विक्रमगड, दि. 27 : तालुक्यातील मलवाडा या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह सदस्यांच्या 9 जागांसाठी 26 डिसेंबर रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल बुधवारी (दि. 27) लागला असून या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रणित परिवर्तन पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत सरपंचपदासह सदस्यांच्या 9 जागी विजय मिळविला.
ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी बविआ पुरस्कृत उमेदवारांचा पुरता धुव्वा उडाल्याने या पॅननला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. त्यामुळे सर्व जागांवर भाजपा प्रणित परिवर्तन पॅनलला घवघवित यश मिळाले. या निवडणुकीत प्रथमच भाजपा प्रणित परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व जागा लढविल्या. या पॅनलचे नेतृत्व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कमळाकर भोईर व बारकु कोलेकर यांनी केले. सरपंच पदासाठी प्रथमच थेट पध्दतीने मतदान झाले. सरपंचपदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते. परिवर्तन पॅनलचे चंद्रकांत पाटील व बविआ पुरस्कृत रमेश पागी यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत चंद्रकांत पाटील हे सर्वाधिक 682 मते घेत विजयी झाले. तर सदस्यपदाच्या 9 जागांसाठी 18 उमेदवार रिंगणात होते. सदस्यांच्या सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकून मलवाडा ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भाजपा प्रणित परिवर्तन पॅनलचे सर्व उमदेवार निवडुन आल्याने कार्यकर्त्यांनी तहसिलदार कार्यालयाच्या आवारात फटाक्यांची आतशबाजी करीत जल्लोष केला. यावेळी सभापती मधुकर खुताडे, तालुका अध्यक्ष संदिप पावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top