दिनांक 21 October 2018 वेळ 12:48 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » सर्वांनी लोकशाही व्यवस्था समजून घेतल्याशिवाय देश महासत्ता बनणार नाही! -संजीव जोशी

सर्वांनी लोकशाही व्यवस्था समजून घेतल्याशिवाय देश महासत्ता बनणार नाही! -संजीव जोशी

राजतंत्र न्यूज नेटBHARTIY RAJYAGHATNAवर्क
दि. 21 : सर्वांनीच लोकशाही व्यवस्था समजून घेतल्याशिवाय आपला देश महासत्ता बनू शकणार नाही. आपल्या देशाचा कारभार कसा चालतो ते आपण समजून घेतले पाहिजे आणि देशाच्या प्रगतीसाठी सक्रिय झाले पाहिजे, असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथे बोलताना केले. ते मुंबईस्थीत के. जे. सोमैय्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावर बोलत होते.
जोपर्यंत आपण लोकशाही व्यवस्था समजून घेत नाही तो पर्यंत स्वतःला समाधानी करु शकत नाही. देशाचा सक्षम नागरिक होण्यासाठी अभ्यासक्रमातील भारतीय राज्यघटनेसंदर्भातील प्रकरणांचा अभ्यास प्रश्‍नोत्तरे देण्यासाठी अथवा परिक्षेत पास होण्यासाठी न करता त्यातील बलस्थाने समजून घ्यावीत असा सल्ला देखील जोशी यांनी यावेळी दिला. राज्यघटनेची तोंडओळख करुन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्‍नांचे जोशी यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केला.

comments

About Rajtantra

Scroll To Top