दिनांक 21 January 2018 वेळ 4:30 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मारुती वाघमारे यांचा निवृत्त सेवा पुरस्काराने गौरव

मारुती वाघमारे यांचा निवृत्त सेवा पुरस्काराने गौरव

डहाणू, दि. 21 : महाराष्ट्र राMARUTI WAGHMARE JIVAN GAURAV PURSKARज्य पेंशनर्स असोसिएशन या सेवानिवृत्तांच्या संघटनांच्या शिखर संस्थेतर्फे डहाणू तालुका सेवा निवृत्त संघाचे अध्यक्ष मारुती वाघमारे यांचा निवृत्त सेवा पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यात आला आहे. 19 डिसेंबर रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात फेसकाम, पुणेचे अध्यक्ष श्रीराम बेडकिहाळ यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पेंशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ नाईक होते. यावेळी पालघर जिल्ह्यातील संघाचे पदाधिकारी विनायक शेळके, बापूराव देवकर, रमेश शिर्के, मुरलीधर माच्छी उपस्थित होते.
शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मारुती वाघमारे यांनी निवृत्त सेवा संघाच्या बांधणीसाठी, आर्थिक बळ वाढविण्यासाठी, पालघर जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे प्रशासकीय व आर्थिक प्रश्‍न सोडविण्यासाठी भरीव कामगिरी केली. विविध शासकीय समित्यांवर ते कार्यरत आहेत. त्याचीच दखल घेऊन मानाच्या या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.

comments

About Rajtantra

Scroll To Top