दिनांक 21 January 2018 वेळ 4:27 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » समर्थकांना उमेदवारी देणे शिवसेनेच्या अंगलट

समर्थकांना उमेदवारी देणे शिवसेनेच्या अंगलट

वैभव पालवे
वाडा, दि. 21 : नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजपसारख्या बलाढ्य शक्ती समोर लढाई करून नगराध्यक्षपदासह सहा नगरसेवकांच्या जागा जिंकून भाजपला शह देण्यात यश मिळवलं असलं, तरी शिवसेनेला मंत्री सवरांविरोधातील जनमानसात असलेल्या नाराजीचा फायदा झाला हे मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतेय.
या निवडणुकीत शिवसेना प्रचंड विस्कळीत होती. शहरातील प्रत्येक नेता आपल्या समर्थकाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नात होता. एका नेत्याच्या हाती निवडणुकीची सूत्रं नसल्याने प्रत्येकाचे हितसंबध जोपासण्यात शिवसेनेला प्रारंभी सोपी वाटणारी निवडणूक अवघड बनली. त्यातच शिवसेनेचे माजी विधानसभा संपर्कप्रमुख माजी सरपंच गिरीश पाटील यांची कन्या सायली पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविल्यामुळे शिवसेने पुढील आव्हान वाढले होते. या बंडWADA NIVADNUK VISHLESHAN -2खोरीमुळे शिवसैनिक अधिक कडवा बनल्यामुळे शिवसेना नेतृत्वाच्या पातळीवर विस्कळीत दिसत असली तरी प्रत्येक्ष निवडणुकीत शिवसैनिक अधिक जोमाने उतरला. त्यामुळे भाजपच्या निशा सवरांचे कडवे आव्हान परतवण्यात शिवसेना यशस्वी ठरत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीतांजली कोलेकर विजयी झाल्या.
या निवडणुकीत शिवसेना नगराध्यक्षपदी विजयी झाली असली तरी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लागल्याने शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. शिवसेनेला नगरसेवकपदाच्या सतरा पैकी अवघ्या सहा जिंकता आल्या. शिवासेनेच्या बालेकिल्ल्यातील जागा भाजप व काँग्रेसने जिंकल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्क मानला जात आहे. या निवडणुकीत शिवसेना किमान दहा जागांच्या आसपास जागा जिंकेल असा अनेक राजकीय निरीक्षकांचा होरा होता. शिवसेनेचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश गंधे बारा ते तेरा जागा जिंकण्याचा दावा करत होते. मात्र मतदारांनी ज्या पध्दतीचा कौल दिला ते पाहिल्यानंतर गंधेंना मतदारांना कायम गृहीत धरण्याची चूक पुन्हा न करण्याचाच वस्तुपाठ घालून दिला आहे.
मुळात शिवसेनेच्या उमेदवार्‍या निश्चित करताना आपापल्या समर्थकांना निवडणुकीत कशा उमेदवार्‍या मिळतील यासाठी पदाधिकारी प्रयत्नशील राहिले. त्यामुळे शिवसेनेचे प्रचंड नुकसान झाले. गेले दहा वर्ष ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेची सत्ता होती. या सत्तेच्या काळात काय पध्दतीचा कारभार शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केला हे जनतेने अनुभवले होते. विद्यमान सरपंचांवर तर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यामुळे शिवसेनेच्याही विरोधात जनतेत प्रचंड नाराजी होती. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक अवघड होती. मात्र नशिबाने भाजपने नगराध्यक्षपदाकरिता आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरांची कन्या निशा सवरांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीचा संपूर्ण फोकस सवरांवर गेल्याने निवडणूक प्रचाराच्या काळात सवरा हेच चर्चेचे केंद्र बनले. त्यामुळे शिवसेनेच्या भ्रष्ट कारभाराची चर्चाच झाली नाही. संपूर्ण प्रचारा दरम्यान विकासावर चर्चा झाल्याने मंत्री सवरांनी 25 वर्ष आमदारकी व तीन वर्षाच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाडा शहराच्या विकासासाठी काय केले? याचीच उघडपणे चर्चा झाल्याने मंत्र्यांच्या तुलनेत शिवसेनेचे सरपंचपद गौण ठरले. त्यामुळे या विकासाच्या मुद्द्याच्या आड शिवसेनेला लपणे अधिक सोयीचे झाले. विकासाचा मुद्दा समाजमाध्यमावर वाडा सोशल गृपने अधिक प्रखरपणे लावून धरल्याने भाजपला विकासाच्या मुद्द्यावर बॅकफूटवर येणे भाग पडले. भाजपाशिवाय अन्य समर्थ पर्याय मतदारांपुढे नसल्याने या निवडणुकीत शिवसेनेला लाभ उठवता आला.
समर्थक उमेदवारांना पराभवाची धूळ
शिवसेनेचे वाड्यातील प्रमुख पदाधिकारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश गंधे, तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, शहरप्रमुख प्रकाश केणे यांच्या समर्थक उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागल्याने शिवसेनेचे संख्याबळ घटले. नीलेश गंधेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांचे समर्थक उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे गंधेंना नेतृत्वाच्या पातळीवरही नवी आव्हानं उभी राहिली आहेत. श्रीकांत आंबवणेंसारख्या प्रबळ उमेदवाराला वैभव भोपतरावांकडून पराभूत व्हावं लागणं हे गंधेंच्या प्रचंड जिव्हारी घाव घालणारं आहे. ज्या प्रभागात भोपतरावांचे हक्काचे एक मत नसताना त्यांच्याकडून आंबवणेंचा पराभव होणे व रश्मी गंधेंचा भाजपच्या रिमा गंधेंनी मोठ्या फरकाने केलेला पराभल्ल हे नीलेश गंधेंचा वाणी समाजातील पाया डळमळीत झाल्याचे द्योतक आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस मधून गंधेंनी आयात केलेल्या भरत थोरातांनाही पराभव स्वीकारावा लागल्याने गंधेंचे आडाखे पूर्णपणे चुकल्याचीच चर्चा आहे.
तर तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या पत्नी सविता पाटील यांनाही पराभव स्वीकारावा लागला. खरेतर प्रकाश पाटील यांनी तालुकाप्रमुख असल्याने स्वतःला एका प्रभागात अडकवून घेण्याऐवजी अन्य कार्यकर्त्याला उमेदवारी देत निवडणुकीची सूत्रं आपल्या हाती घ्यायला हवी होती. सविता पाटील लढलेल्या प्रभागातील निवडणूक ही नातेसंबंधांवर अधिक अवलंबून होती. त्यात त्यांच्यासमोर भाजपकडून त्यांच्या सख्ख्या मामी उभ्या राहिल्याने त्यांच्यासाठी निवडणूक अवघड बनली. पराभवामुळे शिवसेना जिंकली असली तरी त्याचे क्रेडिट त्यांना मिळणे दुरापास्त आहे. तर शहर प्रमुख प्रकाश केणेंचे समर्थक सुभाष झोपे यांच्या पत्नीला कुणबी बहुल प्रभागात उमेदवारी दिल्याने पराभवाचा सामना करावा लागला. कोणतेही जातीचे समीकरण सोबत नसताना झोपेंना उमेदवारी देणे हे शिवसेनेला पराभवाकडे नेणारे ठरले. त्याच प्रमाणे सुभाष बनकर, इरफान शेख यांनाही पराभव स्वीकारावा लागला, संदीप गणोरे स्वतः विजयी झाले असले तरी त्यांचे समर्थक रवींद्र कामडींनाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पदाधिकार्‍यांच्या समर्थकांना उमेदवार्‍या देणे शिवसेनेच्या चांगलंच अंगलट आलं आहे. सर्व समर्थकांना पराभवाचा सामना करावा लागल्याने बारा-तेरा जागा जिंकण्याच्या फुशारक्या मारणारी शिवसेना नगरसेवकांच्या अवघ्या सहा जागांवर अडकल्याने नगराध्यक्षपदाच्या विजयानंतरही अनेकांचे चेहरे सुतकी बनले.

गंधेंच्या नेतृत्वावरील संशयाचे मळभ दूर

भाजपला आव्हान असलेल्या शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने नीलेश गंधेंना प्रभाग 2, 3 व 6 मध्ये जखडून ठेवण्याचा पुरता प्रयत्न केला. गंधेंच्या बालेकिल्ल्यातच त्यांना आव्हान देत जाळ्यात अडकवून ठेवण्यात भाजप यशस्वी होताना दिसत होती. मात्र गंधेंनीही हा डाव ओळखून नगराध्यक्षपदावरील आपलं लक्ष विचलित होऊ दिले नाही. त्यामुळे भाजपला अपेक्षित नगराध्यक्षपदावर विजय मिळविता आला नाही. गंधेंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या बहुतांश जागा शिवसेना हरली असली तरी नगराध्यक्षपदी गीतांजली कोलेकरांना निवडून आणत विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्यात ते यशस्वी झाले आहेत. मंत्री सवरांसमोर लढाई असताना त्यातच जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपदा त्यांच्या कृपेने गंधेंना लाभले असल्याने ते छुप्या पध्दतीने सवरांना निवडणुकीत मदत करतील अशी संपूर्ण निवडणूक काळात चर्चा होती. त्यांचे विरोधक व पक्षांतर्गत विरोधकही ह्याची उघडपणे चर्चा करत असत त्यामुळे गंधेंच्या पक्षनिष्ठेबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. यदाकदाचित शिवसेना पराभूत झाली असती आणि निशा सवरा विजयी झाल्या असत्या तर पराभवाचे खापर गंधेंच्याच माथी फुटले असते. मात्र निवडणुकीतील विजयाने गंधेंचे नेतृत्वावरचे संशयाचे मळभ दूर झाल्याने गंधेंचा जीव भांड्यात पडला असावा. मात्र निवडणूक निकालाने शिवसेनेच्याही सर्वच पदाधिकार्‍यांच्या डोक्यातील झिंग मतदारांनी उतरविल्याने मिळालेल्या सत्तेचा उपयोग खर्‍याअर्थाने वाड्याच्या विकासासाठी शिवसेनेने केला तरच शिवसेनेला या निकालाचा अर्थ उमगला असे म्हणावे लागेल.

comments

About Rajtantra

Scroll To Top