दिनांक 21 January 2018 वेळ 4:30 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार : आदिवासी विकास परिषदेचे बेमुदत आमरण उपोषण सुरूच

जव्हार : आदिवासी विकास परिषदेचे बेमुदत आमरण उपोषण सुरूच

प्रतिनिधीJAVHAR UPOTION
जव्हार, दि. 20 : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनेच्या पालघर शाखेने आदिवासी पालकांना न्याय मिळावा तसेच इतर मागण्यांसाठी मंगळवारपासून जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आमरण बेमुदत उपोषणास सुरवात केली असून आज दुसर्‍या दिवशीही हे उपोषण सुरुच होते.
अखिल भारतीय विकास परिषदेच्या नेतृवाखाली आदिवासी प्रकल्पाच्या इंग्रजी नामांकित शाळेत प्रवेश देण्यासाठी आदिवासी पालकांकडून पैसे उकळणारे कनिष्ठ लिपिक ए. डी. बागुल यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. प्रकल्प कार्यालयातील 9-10 वर्षांपासून ठाणं मांडून बसणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांची शासन निर्णयानुसार तात्काळ बदली करण्यात यावी, आदिवासी विकास प्रकल्पामार्फत चालविण्यात येणारी वसतिगृह, अधीक्षक आणि शिक्षकांची भरती नियमानुसार करावी, आदिवासी विकास प्रकल्पातील विविध योजनांची चौकशी करून कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी संघटनेचे कार्यकर्ते पालकांसोबत उपोषणास बसले आहेत.
या उपोषणाची दखल घेत प्रकल्पातील अधिकार्‍यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्यावर कार्यकर्ते ठाम आहेत. दरम्यान, काही कार्यकर्त्यांची तब्येत खालावली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top