दिनांक 21 January 2018 वेळ 4:27 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाड्याचा निकालाने सर्वपक्षीय नेतृत्वांच्या फुग्याला टाचणी

वाड्याचा निकालाने सर्वपक्षीय नेतृत्वांच्या फुग्याला टाचणी

वैभव पालवे
निवडणूक विश्लेषण : भाग – 1

वाडा, दि. 20 : वाडा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सोमवारी लागल्यानंतर वाड्यातील सुज्ञ मतदारांनी ज्या पध्दतीने मतांचं दान राजकीय पक्षांच्या पारड्यात टाकलं, ते पाहता सर्वपक्षीय नेतृत्वांच्या फुग्याला टाचणी लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोणत्याही एका पक्षाचे महत्व वाढून नेतृत्वाच्या डोक्यात हवा जाणार नाही याची नेमकी काळजी यावेळी मतदारांनी घेतली. त्यामुळे विजय मिळूनही विजयाचा आनंद काही नेत्यांना घेता आला नाही. तर पराभूतांनाही मिळालेल्या यशात सूख वाटावं असा निकाल दिल्याने हवेतील कथित नेतृत्वांचे पाय जमिनीवर आले आहेत.
सवरांना मतदारांनी अस्मान दाखवलं
आदिवासी विWADA NAGARPANCHAYAT LEKH 1 Pic1कासमंत्री विष्णू सवरांना अधिकाराचे पद मिळूनही शहरात विकासकामे करू शकले नाहीत, याचा जबर फटका त्यांची कन्या निशा सवरा यांना बसला. खरे तर विधानसभा निवडणुकीत एखादे गाव नाराज असले तर उमेदवाराला तेव्हढासा फरक पडत नसतो. अशा छोट्या निवडणुकीत मात्र उमेदवाराचा कस लागत असतो. त्याची प्रचिती या निवडणुकीत निशा सवरा आणि मंत्री सवरांना आली असावी. गेली 28 वर्ष वाड्यातील मतदारांनी सवरांवर प्रेम केले. त्यांना भरभरून मते दिली. मात्र, त्याबदल्यात सवरांनी वाडा शहराला नेमके काय दिले याची पहिल्यांदा एवढ्या मोठ्याप्रमाणावर चर्चा झाली. लोकं थेट प्रश्‍न विचारू लागले. त्या प्रश्‍नांची भाजपकडे कोणतीही उत्तरे नव्हती. त्यामुळे सुरुवातीपासूनच भाजप बचावात्मक स्थितीत गेली होती.
सवरा हे मंत्री असताना भाजपला निवडणुकीत त्यांची मोठी छबी वापरायला भीती वाटणे हे भाजप बचावात्मक स्थितीत असल्याचेच लक्षण ठरले. सवरांच्या प्रतिमेशिवाय निवडणूक लढणे भाजपच्या अंगलट आल्याचे दिसते. सवरांचा ज्या पध्दतीने सर्वसामान्य जनतेत थेट संपर्क आहे, त्याचा फायदा कदाचीत ते अधिक सक्रीय झाले असते तर निशा सवरांना झाला असता. मात्र तेच बॅकफूटवर गेल्याने विरोधकांना अधिक बळ मिळाले. आगामी काळात विकासकामांशिवाय निवडणुक जिंकणे सोपे नाही हा इशाराच जणू या निवडणुकीने सवरांना दिला आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आपला वारस राजकारणात आणू पाहणार्‍या मंत्री सवरांना निशा सवरांचा पराभव करून मतदारांनी अस्मान दाखवलं.

पवार-पाटील दुकलीची रणनीती फसली

नगरपंचायत निवडणुकीत भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी तालुकाध्यक्ष संदीप पवार व विभागीय सरचिटणीस योगेश पाटील यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा दिली. उमेदवार ठरविण्यापासून प्रचारापर्यंत सर्वच जबाबदार्‍या या दोघांच्या शिरावर होत्या. त्यांच्या चेहर्‍यावरच ही निवडणूक लढली गेली. सर्व प्रभागात ते उमेदवार उभे करण्यात यशस्वी झाले असले तरी पक्षाला अपेक्षित यश मिळवून देण्यात अपयशी ठरले.
संदीप पवार व योगेश पाटलांनी या निवडणुकीत पक्ष संघटनात्मकदृष्ट्या मजबूत स्थितीत उतरवला असला, तरी आपले राजकीय हिशेब चुकते करण्याच्या नादात ठरावीक प्रभागात लक्ष केंद्रीत केल्याने त्या प्रभागांमध्ये यश मिळाले असले तरी नगराध्यक्षपदाला यश मिळवून देता आले नाही. पवार व पाटील यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी हर्षद गंधे व वैभव भोपतराव यांच्या माध्यमातून डाव टाकला. योगेश पाटील हे नगराध्यक्षपदाला इच्छुक होते तेव्हाच गंधे व भोपतराव हे त्यांचे नगरसेवक पदाचे उमेदवार होते. मात्र आरक्षण पडल्याने ते निवडणूक लढू शकले नाहीत, तरी नीलेश गंधेंना शह देण्यासाठी पवार-पाटलांनी डाव खेळत हर्षद गंधेंच्या पत्नी रीमा गंधे यांना व भोपतरावांना उमेदवारी देत नीलेश गंधेंपुढे आव्हान उभे केले. त्यातच शिवसेनेतील नाराज नितीन म्हात्रेंना पक्षात प्रवेश देत नीलेश गंधेंच्या शिडातील हवाच काढण्यात ते यशस्वी झाले. परंतु नीलेश गंधेंना धोबीपछाड देण्याच्या नादात अन्य प्रभागात दुर्लक्ष झाल्याने पवारांना आपल्या होम ग्राऊंडवरील प्रभाग क्रमांक 4 व 14 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. तर योगेश पाटलांनी प्रभाग क्रमांक 9, 12, 15, 16, 17 मध्ये आपल्या समर्थकांना उमेदवार्‍या दिल्या होत्या. मात्र या सर्व उमेदवारांना पराभूत व्हावे लागल्याने त्याचा फटका नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निशा सवरांनाही बसला. त्यामुळे नगराध्यक्षपदासह बारा जागा जिंकण्याच्या गमजा मारणार्‍या भाजपला नगरसेवकांच्या अवघ्या सहा जागां जिंकता आल्या. त्यामुळे पवार – पाटील दुकलीची निवडणूक रणनीती फसल्याचीच चर्चा सुरु आहे.

आप्तस्वकियांना उमेदवारी देणे शिवसेनेच्या अंगलट

 

comments

About Rajtantra

Scroll To Top