दिनांक 16 January 2019 वेळ 3:37 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 निवडणूक प्रचाराचा रणसंग्राम शिगेला पोहोचला

डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 निवडणूक प्रचाराचा रणसंग्राम शिगेला पोहोचला

शिरीष कोकिळ
दि. 13 : डहाणू नगर परिWADA NAGARPANCHAYAT LEKH 1 Pic1षदेच्या निवडणूकीसाठी मैदानात उतरलेल्या नगराध्यक्षपदासाठीच्या 7 व नगरसेवकपदांसाठीच्या 110 उमेदवारांनी प्रचारास सुरवात केली असून आता प्रचाराचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. नगराध्यक्षपदांच्या उमेदवारांच्या दृष्टीने ही निवडणूक अस्तित्त्वाचा प्रश्‍न निर्माण करणारी ठरणार आहे.
काही उमेदवारांच्या अर्जामध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांना न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागल्याने राज्य निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख 13 डिसेंबर ऐवजी 17 डिसेंबर निश्चित केली. यामुळे प्रचारासाठी अधिकचे 4 दिवस मिळाले आहेत. यावेळी डहाणूत प्रथमच प्रचाराचे वेगवेगळे प्रकार पहायला मिळत आहेत. नागरिकांना प्रत्यक्ष भेटणे, कार्यकर्त्यांमार्फत घरोघरी पत्रके वाटणे, वाहनांतून जाहीर प्रचार करणे, वेगवेगळ्या भाषांतील गाणी नागरिकांना ऐकवणे, एवढेच नव्हे तर पहिल्यांदाच डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करुन एलसीडी व्हँनचाही प्रभावी वापर होताना दिसत आहे. प्रचारामध्ये सर्वच पक्षांनी आश्वासनांची खैरात वाटली असली तरी नगरपरिषदेच्या एकूण बजेटचा सर्वच पक्षांना विसर पडलेला दिसून येतो आहे.
डहाणू तालुका विकास परिषदेतर्फे निवडणूका, डहाणूचा विकास या संदर्भात घेतलेल्या चर्चासत्रांमुळे मतदारांना आपल्या अधिकाराची जाणीव झाली असून नगरसेवकांनाही आपल्या कर्तव्य व जबाबदारी याचा गांभीर्याने विचार करावा लागला आहे. आणि याचमुळे काही प्रस्थापित नगरसेवकांना स्वत:ला आश्वासित करणे अवघड झाले आहे. स्थानिक निवडणूकांमध्ये पक्षापेक्षा कामं करणार्‍या उमेदवाराला महत्त्व आहे हा विचार नागरिकांमध्ये रुजला. या सर्व बाबींचा परिणाम म्हणून की काय प्रचारामध्ये मोठी चुरस निर्माण झाली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने प्रचारासाठी वाढवून दिलेली मुदत पक्षाला उपयुक्त ठरत असली तरी उमेदवारांसाठी ती त्रासदायक ठरत असल्याचे बोलले जात आहे. उमेदवारांना वाढीव खर्चाला सामोरे जावे लागत आहे. डहाणूचा खर्‍या अर्थाने विकास व्हावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या सगळ्यांच्या प्रयत्नांना काय दिशा मिळेल हे 18 डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर कळून येईल.

comments

About Rajtantra

Scroll To Top