दिनांक 23 January 2018 वेळ 3:15 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्थेच्या कणसरी दिनदर्शिका 2018 चा प्रकाशन सोहळा संपन्न

पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्थेच्या कणसरी दिनदर्शिका 2018 चा प्रकाशन सोहळा संपन्न

प्रतिनिधी : DINDARSHIKA SOHLA
जव्हार, दि. 13 : पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्था यांच्या वतीने कणसरी दिनदर्शिका 2018 चा प्रकाशन सोहळा आज येथील स्नेहांकित पेन्शनर भवनात सजन नंदू खुताडे गुरुजी यांच्या हस्ते पार पडला. या दिनदर्शिकेमध्ये आदिवासी साहित्य, आदिवासी सण, विविध शासकीय योजना, पेसा कायदा माहिती तसेच विविध आदिवासी नृत्यांविषयी माहिती, आदिवासी कुल देवतेची माहिती व सर्व शासकीय सुट्ट्यांचा उल्लेख केलेला आहे. ही सर्व माहिती युवा पिढीसह आदिवासी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचावी या उद्देशाने कणसरी दिनदर्शिका प्रकाशित केली जाते.
यावेळी रमेश लक्ष्मण गुरवसवादे यांचा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व आदिवासी समाजात विविध उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेच्या वतीने अध्यक्ष काशिनाथ डोके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सल्लागार विनायक शेळके, केशव महाला, लक्ष्मण लोहार, लक्ष्मीबाई भोये, सरस्वती भोये, आदिवासी सेवक संजय वांगड, नगरसेवक राजू राऊत, पत्रकार मनोज कामडी व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोपाळ बोरसे सर यांनी केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top