दिनांक 11 December 2018 वेळ 12:03 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » डॉ. अमित नहार यांच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे तक्रार; सैनिकांचा वापर प्रचारात करण्याला आक्षेप!

डॉ. अमित नहार यांच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे तक्रार; सैनिकांचा वापर प्रचारात करण्याला आक्षेप!

डहाणू नगरपरिषदेच्या 17 डिसेंबर रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपला रामराम करुन नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार डॉ. अमित नहार यांनी आचारसंहीतेचा भंग केल्याची तक्रार एका नागरिकाने निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे केली आहे. या तक्रारी अर्जामध्ये दोन आक्षेप आहेत. डॉ. अमित नहार यांनी आपल्या जाहिरनाम्यामध्ये सैनिकांचे फोटो छापल्याने आचारसंहीतेचा भंग झाल्याचा एक आक्षेप तर दुसरा आक्षेप म्हणजे दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांचा फोटो जाहिरनाम्या3 Amit Nahar (1Colmn)त छापला असून यामुळे 2 डिसेंबर 2017 रोजी सर्व नगराध्यक्षपदाचे व नगरसेवक पदाचे उमेदवार एका व्यासपिठावर आणणारा कार्यक्रम डॉ. अमित नहार यांनी प्रयोजित केला होता अशी शंका वजा आरोप! यामुळे डॉ. अमित नहार यांना राजकारणाचे चटके बसु लागल्याचे समोर येत आहे. याच तक्रारदाराने डॉ. अमित यांच्या विरोधात आरोप करणारे आणखी एक पत्रक प्रसिद्ध केल्याचे समोर आले आहे.

याबाबत दैनिक राजतंत्रची भुमिका!
लोकशाहीमध्ये लोक आपली मते निर्भीडपणे मांडतात याचे स्वागतच करायला हवे. या तक्रारीचे कारण तक्रारदाराला डॉ. अमित नहार यांचे बरोबर वैयक्तीक भांडण असेल, अथवा त्याच्या मनाला सैनिकांचा वापर राजकीय लाभ मिळविण्यास आक्षेप असेल अथवा जिल्हाधिकारी यांनी दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांना यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध केल्याबाबत नोटीस दिलेली असल्यामुळे संजीव जोशी यांचे नाव नमूद केले म्हणजे या तक्रारीची गांभिर्याने दखल घेतली जाईल असेही असू शकते. काहीही असले तरी निवडणूकांच्या काळात प्रसारमाध्यमांनी अधिकाधिक पारदर्शकता बाळगायला हवी या भावनेने या बाबत आमची भूमिका मांडत आहोत.

सैनिकांच्या नावाने रक्तदान शिबिर भरवून त्याचा वापर राजकीय लाभ घेण्यासाठी योग्य की अयोग्य हे ज्याने त्याने आपआपल्या नैतिक समजातून काढावे. याबाबत आदर्श आचारसंहीतेचा भंग झाला असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या स्तरावर योग्य तो निर्णय घेतीलच. सैन्य दलाला काही आक्षेप असेल तर ते त्यांच्या स्तरावर भूमिका घेतील. जनता देखील मतपेटीद्वारे भूमिका बजावेल. आम्हाला त्याबाबत काही म्हणायचे नाही.

डॉ. अमित नहार यांनी जाहिरनाम्यात दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांचा फोटो छापला आहे. याचा अर्थ संजीव जोशी डॉ. अमित नहार यांचे प्रचारक आहेत का?
संजीव जोशी हे डॉ. अमित नहार यांनी आयोजित केलेल्या एका आरोग्य शिबीरात निमंत्रणावरुन गेले होते. यावेळी जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळचा फोटो प्रचाराच्या पत्रकात छापण्यासाठी डॉ. अमित नहार यांनी परवानगी घेतलेली नाही. राजकीय प्रचाराच्या सामुग्रीपासून संजीव जोशी यांना अलिप्त ठेवले असते तर ते अधिक योग्य ठरले असते. संजीव जोशी हे डॉ. अमित किंवा कोणाचेही प्रचारक नाहीत. त्यांचे वैयक्तीक मत ते योग्य त्या उमेदवारांना गुप्त पद्धतीने देतील. ते येथे उघड करणे योग्य नाही. तथापी डॉ. अमित नहार यांनी जोशी यांचा फोटो अजाणतेपणाने छापला असावा असे गृहीत धरले जात आहे. याबाबत आता निवडणूकीला 4 दिवस बाकी राहिले असताना त्याबाबत याच्यापेक्षा जास्त भाष्य करणे उचित ठरणार नाही.

2 डिसेंबर 2017 रोजी सर्व नगराध्यक्षपदाचे व नगरसेवक पदाचे उमेदवार एका व्यासपिठावर आणणारा कार्यक्रम डॉ. अमित नहार यांनी प्रयोजित केला होता का? हा कार्यक्रम यु ट्यूब वरुन थेट प्रक्षेपीत करण्यात आला होता. आजही तो यू ट्यूब वर उपलब्ध आहे. त्याचे अवलोकन करुन या प्रश्‍नाचे उत्तर ज्याने त्याने आपआपल्या सद्विवेकबुद्धीने शोधावे. आम्हाला त्याबाबत काही भाष्य करावयाचे नाही.

लोकांना डहाणू तालुका विकास परिषदेचे कार्यक्रम कसे होतात? याविषयी कुतूहल आहे. याकरीता लोकांना सांगायला आवडेल की, लोकशाही समृद्ध करण्याच्या प्रबळ हेतूने दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांच्या पुढाकाराने काही समान विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन डहाणू तालुका विकास परिषद हे व्यासपिठ उभे केले असून या सर्वांच्या खिश्यातून हा खर्च केला जातो. सर्व सदस्यांमधून खर्चाची समान विभागणी केली जाते. परिषदेच्या बाहेरील लोकांकडून पैसे स्विकारले जात नाहीत. 31 ऑक्टोंबर रोजी नगरसेवक व जनतेमध्ये संवादाचा जो कार्यक्रम झाला त्यासाठी परिषदेने 13 हजार 550 रुपये खर्च केला. तर 2 डिसेंबर रोजीच्या कार्यक्रमासाठी 31 हजार 985 रुपये खर्च करण्यात आला. हा सर्व खर्च आम्ही वैयक्तीक रित्या खर्च केला आहे. याशिवाय भारतीय राज्यघटनेचा प्रचार व प्रसार करणे अशा कार्यक्रमांसाठी रोटरी क्लब ऑफ डहाणू व लॉयन्स क्लब ऑफ डहाणू यांसारख्या संस्था विनामुल्य जागा देत असतात. मंडप/माईक सिस्टीम व सर्व सेवा पुरवठादार त्यांच्या बिलांमध्ये शक्य तितकी सूट देतात. त्यांची भावना देखील कार्यक्रमाच्या आयोजनात सहाय्यभूत ठरते.

comments

About Rajtantra

Scroll To Top