दिनांक 21 September 2019 वेळ 5:52 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » मराठी पत्रकार परिषदेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी संजीव जोशी

मराठी पत्रकार परिषदेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी संजीव जोशी

SANJEEV JOSHI दि. 15 ऑगस्ट 2016: राज्यभरातील पत्रकारांचे नेतृत्व करणार्‍या मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांची एकमताने निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष दीपक मोहिते (ब्यूरो चिफ: दैनिक पुढारी) यांनी वैयक्तीक कारणासाठी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी हर्षद पाटील (प्रतिनिधी: झी मिडीया/दैनिक पुण्यनगरी) यांच्यासह अन्य कार्यकारीणी कायम ठेवण्यात आली असून ज्येष्ठ पत्रकार निरज राऊत (जिल्हा प्रतिनिधी दैनिक सकाळ/आयबीएन लोकमत) यांची परिषदेच्या राज्य कार्यकारीणीवर प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. दिपक मोहिते यांची कार्यकारीणीचे सल्लागार म्हणून निवड झाली आहे.
शनिवारी (दि. 13) पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील शासकिय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या कोकण विभागीय सचीव श्रीमती धनश्री पालांडे उपस्थीत होत्या. बैठकीस जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू, पालघर, वसई या तालुक्यांतील वर्तमानपत्र व वृत्तवाहिनीचे 37 पत्रकार उपस्थित होते.
जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी भगवान खैरनार (दैनिक सकाळ/सामना) व शशिकांत कासार (टिव्ही 9 मराठी), चिटणीसपदी ओमकार पोटे (दैनिक पुढारी/सामना) व दिनेश यादव (दैनिक ठाणे वैभव), कोषाध्यक्षपदी राहूल पाटील (जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी), संघटक वैभव पालवे (सा. प्रजासंवाद), वैदेही वाढाण (दैनिक पुढारी), कार्यकारिणी सदस्यपदी प्रमोद पाटील (दैनिक सकाळ), नामदेव खिरारी (दैनिक सकाळ), सुनील घरत (दैनिक लोकमत), वसंत भोईर (दैनिक लोकमत), संजयसिंग ठाकूर (दैनिक नवभारत टाईम्स), रुपेश पाटील (साम टिव्ही) यांची फेरनिवड करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार पी. एम. पाटील, अच्युत पाटील, निरंजन राऊत, अशोक पाटील हे सल्लागारपदी तर शशी करपे (ब्यूरो चिफ: दैनिक लोकमत), सुहास बिर्‍हाडे (ब्यूरो चिफ: दैनिक लोकसत्ता) व पंकज सतिष राऊत (संपादक पालघर मित्र) हे निमंत्रीत सदस्यपदावर कायम आहेत.
पालघर, वाडा, डहाणू व तलासरी तालुक्यांच्या समित्यांची देखील यावेळी स्थापना करण्यात आली असून पालघर तालुका अध्यक्षपदावर पी. एम. पाटील तर सचीवपदावर मनोज पंडीत, वाडा तालुका अध्यक्षपदावर वसंत भोईर व सचीव पदावर पवन शेलार, डहाणू तालुका अध्यक्षपदावर अच्युत पाटील व सचीव पदावर रुपेश पाटील, तलासरी तालुका अध्यक्षपदावर प्रविण चव्हाण व सचीव पदावर सुरेश वळवी यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी समर्थन या संस्थेचा मानवी हक्क वार्ता हा मानाचा पुरस्कार मिळवणारे चिटणीस ओमकार पोटे व उपाध्यक्ष भगवान खैरनार यांचा संघाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष संजीव जोशी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

comments

About Rajtantra

Scroll To Top