दिनांक 21 January 2018 वेळ 4:30 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 सर्वच पक्षांची प्रचारात घोडदौड

डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 सर्वच पक्षांची प्रचारात घोडदौड

facebook_1506002192949
दि. 4: डहाणू नगरपरिषदेच्या 13 डिसेंबर रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आता प्रचाराने वेग पकडला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष व शिवसेना सर्व 12 प्रभागांतून सर्वच्या सर्व 25 जागांवर आपापल्या उमेदवारांसह रिंगणात उतरले आहे. काँग्रेस पक्ष सर्व जागी उमेदवार उभे करण्यात अपयशी ठरला असला तरी सईद शेख यांच्या प्रभाग क्र. 2 मधील उमेदवारीला मुंबई उच्च न्यायालयाने व ज्ञानेश्‍वर चौधरी यांच्या प्रभाग क्र. 10 मधील उमेदवारीला पालघर जिल्हा न्यायालयाने हिरवा झेंडा दाखविल्यानंतर या पक्षाचे देखील बळ वाढले आहे.

प्रचाराला वादळी निर्णयाचा आणि वादळाचा फटका
या निवडणूकीमध्ये अननुभवी असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी आंचल गोयल यांच्या वादळी निर्णयांचा 31 उमेदवारांना फटका बसला. छाननीमध्ये बाद झालेल्या 31 उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचहे महत्वाचे शिलेदार व विद्यमान नगरसेवक राजेंद्र माच्छी यांच्यासह राणी पवार, काँग्रेसचे एकमेव विद्यमान नगरसेवक सईद शेख यांच्यासह ज्ञानेश्‍वर चौधरी, शिवसेनेच्या दीपा कणबी व भाजपाचे यशवंत कडू यांचा समावेश होता. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस प्रत्येकी 2 प्रभागांतून 4 जागांवर बाधीत होत होती. तर शिवसेना व भाजप प्रत्येकी 1 प्रभागातून 2 जागांवर बाधीत होत होती. या सर्व उमेदवारांना न्यायालयाने दिलासा दिला असला तरी या उमेदवारांच्या प्रचारात 10 दिवसांचा खंड पडला. आंचल गोयल यांच्या वादळी निर्णयाच्या फटक्यातून सावरत असताना पुन्हा प्रचाराला ओखी वादळाने घेरले. आता या दोन्ही वादळातून सध्या तरी सुटका झाली असून सर्व जण नव्या दमाने प्रचाराला लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज प्रचारात नाही
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकीकडे जव्हार नगरपरिषदेच्या निवडणूकीत माजी उप मुख्यमंत्री अजीत पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सभा लागलेल्या असताना डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीत मात्र मोठ्या प्रचारसभा घेण्यापेक्षा दारोदार प्रचार करण्याचे धोरण अवलंबीलेले दिसते.

भाजपला मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्षा
भाजपाच्या प्रचारात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यावे असे प्रयत्न सुरु असून हे नेते आल्यास प्रचारात रंगत येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणा शहराला सुखावू शकतात. मात्र आता बदललेल्या परिस्थितीत हे दिग्गज प्रचारात उतरतात कि, पालकमंत्री विष्णू सवरा आणि जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांच्यावर निवडणूका सोपवतात हे येणार्‍या काळात स्पष्ट होणार आहे.

शिवसेनेची देखील प्रचारात आघाडी
या निवडणूकीत सर्वप्रथम शिवसेनेने आपला उमेदवार जाहिर केला होता. यामुळे त्यांचे उमेदवार संतोष शेट्टी यांना प्रचारात आघाडी घेता आली आहे. सर्वप्रथम उमेदवारी अर्ज भरणे, शक्तीप्रदर्शन करणे व प्रचाराला लागणे शेट्टी यांना शक्य झाले आहे.

अमित नहार यांचा हायटेक प्रचार
भाजपमधून फारकत घेऊन अपक्ष उमेदवारी लढविणारे डॉ. अमित नहार यांनी पॅनल उभे केले नसले तरी शहराचे नेतृत्व करण्यासाठी सुशिक्षीत व स्वच्छ प्रतिमेचा पर्याय असावा या मानसिकतेतून नहार हे आत्मविश्‍वासाने लढत आहेत. त्यांच्या प्रचारात त्यांनी एलईडी स्क्रीन असणार्‍या व्हॅन उतरवल्या असून हाय टेक प्रचाराची नांदी केली आहे. नहार यांनी प्रचारात उतरवलेल्या तिन चाकी इकोफे्रंडली सायकली देखील लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

काँग्रेससाठी दिग्गज मैदानात उतरण्याची शक्यता कमी
काँग्रेस पक्ष हा निवडणूकीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी उतरलेला असून जव्हार येथे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभा होत असताना त्यांनी डहाणूत येणे टाळले आहे. माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांच्यावरच काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा असणार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top