दिनांक 18 December 2017 वेळ 2:55 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » शिवसेना स्वबळावर भगवा फडकवेल -आमदार रविंद्र फाटक

शिवसेना स्वबळावर भगवा फडकवेल -आमदार रविंद्र फाटक

डहाणू नगरपरिषदIMP__16 BATMI NO. 3 निवडणूकीत शिवसेनेला अनुकूल वातावरण असून सेनेला बहुमत मिळेल असा विश्‍वास आमदार रविंद्र फाटक यांनी डहाणू येथे पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. नगराध्यक्षपदासाठी संतोष शेट्टी हा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा शिवसेनेने दिला असून डहाणू नगरपरिषद भ्रष्ट्राचार मुक्त करणे व शहराचा विकास करणे हे उद्दीष्ट आहे. लवकरच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देखील फाटक यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविषयी छेडले असता आंचल गोयल यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे फाटक यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ, आमदार अमित घोडा, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष शेट्टी व तालुका प्रमुख संतोष वझे उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top