दिनांक 20 October 2018 वेळ 1:19 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » अखेर डॉ. अमित नहार यांची भाजपमधून हकालपट्टी

अखेर डॉ. अमित नहार यांची भाजपमधून हकालपट्टी

डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणारे डॉ. अमित नहार यांना भारतीय जनता पक्षाकडून निलंबीत करण्यात आले आहे. नहार हे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष असून त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. 05भाजपने त्यांना दुर्लक्षीत करुन उमेदवारी न देता डमी उमेदवारी अर्ज भरायला लावून जखमेवर मिठ चोळले. यातून नहार यांनी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. 30 नोव्हेंबर रोजीपर्यंत अर्ज मागे न घेतल्यामुळे अखेर काल (दि. 4) आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहिर केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top