दिनांक 18 December 2017 वेळ 2:55 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विक्रमगडला अवकाळी पावसाचा तडाखा शेती पिकांसह विट भट्टींचे मोठे नुकसान

विक्रमगडला अवकाळी पावसाचा तडाखा शेती पिकांसह विट भट्टींचे मोठे नुकसान

AVKALI PAUSप्रतिनिधी
विक्रमगड, दि. 05 : यंदाच्या वर्षी अगोदरच लांबलेल्या पावसाने ऐन भातकापणीच्या काळात अवकाळी कोसळत तुलक्यातील शेतीचे मोठे नुकसान केल्याने हातातोंडाशी आलेला घास हिसकावला होता. यानंतर उरला सुरला जो काही भात हाती लागला तो शेतकर्‍यांनी आपल्या खळावर ठेवला होता. मात्र काल, सोमवारी दिवसभर कोंडट व दमट वातारणानंतर अचानक सायंकाळपासुन जोरदार पावसाची सुरुवात झाली व आज दुसर्‍या (मंगळवारी) दिवशी देखील सकाळपासुनच या अवकाळी पावसाने जुलै महिन्यातील आवनीच्या पावसासारखी सुरुवात केल्याने शेतकर्‍यांचा खळ्यावरील भात पुर्णपणे भिजवुन टाकला आहे. तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात येणारा भाजीपाला तसेच तुर, हरभरा, चवळी अशा कडधान्यांची देखील धुळधान करुन टाकल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन आता तर शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याचे येथील शेतकर्‍यांनी सांगितले.
मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर घोंघावणार्‍या ओखी चक्रीवादळामुळे दोन दिवसांपासुन होत असलेल्या अवकाळी पावसाचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. त्यासोबतच गवत-पाओलीचे यापुर्वी कोसळलेल्या अवकाळी पावसात मोठे नुकसान झाल्याने त्याला कमी भाव आहे व आता तर खरेदी केलेले गवत देखील खराब झाल्याने व्यापार्‍यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या पावसात गवतपोओली भिजुन काळी पडली असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. तर तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यापासुन विट भट्ट्या सुरु झाल्या आहेत. या भट्ट्यांत काही प्रमाणात कच्ची विट तयार झाली असताना ती देखील पाण्यात भिजल्याने व्यापारी वर्गासह मजुरांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान यावर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकरी, व्यापार, विटभट्टी व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांना अगोदरच मोठा फटका बसला असताना ओखी चक्रीवादळामुळे बरसलेल्या या अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत असलेल्या मंदीत मोठी भर पडणार आहे.
दरम्यान, विक्रमगडमध्ये 11 मी.मी तर तलवाडामध्ये 12 मी.मी. पावसाची नोंद झाली असुन वादळ-वारा नसल्याने तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारची वित्त व जिवीत हानी झाली नसल्याची माहिती निवासी तहसिलदार एस. सी. कामडी यांनी दिली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top