दिनांक 18 December 2017 वेळ 2:55 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जिल्ह्यातील 39 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर

जिल्ह्यातील 39 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर

पालघर, दि.05 : जानेवारी-cropped-LOGO-4-Online.jpgफेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या 39 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असुन 26 डिसेंबर 2017 रोजी या निवडणूका होणार आहेत. यामध्ये डहाणू तालुक्यातील वंकास, राई, सोगवे, आंबेसरी, बोर्डी, किन्हवली, मोडगाव, जांबुगाव, कापशी, सावटा, गांगणगाव, दापचरी, गोवणे, दाभोण अशा 14 ग्रामपंचायती, पालघर तालुक्यातील उच्छेळी, सालवड, उनभाट, टेंभी खोडावे, चटाळे, लालोंडे, खानिवडे-गारगाव, शिरगाव, लालठाणे, जलसार, कपासे, मासवण अशा 12 ग्रामपंचायती, तलासरी तालुक्यातील धिमणीया, गिरगांव, करंजगाव, कवाडा, कुर्झे, उपलाट, उधवा अशा 7 ग्रामपंचायती, वसई तालुक्यातील अर्नाळा, सायवन, अर्नाळा किल्ला अशा 3 ग्रामपंचायती, मोखाडा तालुक्यातील साये, किनिस्ते अशा 2 ग्रामपंचायती व विक्रमगड तालुक्यातील मलवाडा या एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top