दिनांक 18 December 2017 वेळ 2:57 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वसुरी ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

वसुरी ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

प्रतिनिधी
विक्रमगड, दि. 05 : तालुक्VIKRAMGAD UPOTIONयातील ग्रुप ग्रामपंचायत वसुरी या कार्यालयातून माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याच्या विरोधात वसुरी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ प्रमोद पाटील, संदीप देसले, निवृत्ती पाटील, सचिन देसले या तरुणांच्या नेतृत्वाखाली वसुरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे.
वसुरीतील ग्रामस्थांनी तीन महिन्यापूर्वी संबंधित कार्यालयाकडून ग्रामपंचायत हद्दीतील गट नं 1/6 व गट नं 1/7 मध्ये केलेल्या सर्व बांधकामांबाबतचे अर्ज व त्यांना ग्रामपंचायतीकडून दिलेल्या सर्व प्रकारच्या परवानग्यांच्या छायांकित प्रति मिळाव्यात तसेच ग्रामपंचायतीकडे मागील दोन वर्षांपासून आलेला पेसा कायद्यामधील निधी, 14 वा वित्त आयोग निधीचा केलेला उपयोग व इतर सर्व मार्गाने प्राप्त झालेला निधी व त्याचा खर्च यांची माहिती मागवली होती. परंतु तीन महिन्यांचा कालावधी उलटून सुद्धा ग्रामपंचायतीने माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने वसुरी ग्रामपंचायतीमध्ये चाललेला मनमानी कारभार मोडीत काढण्यासाठी येथील तरुणांनी बेमुदत उपोषणाचे अस्त्र उचलले आहे. या उपोषणास पंचायत समिती सदस्य विजय वेखंडे, शिवसेना युवा उपजिल्हा प्रमुख मनोज खरपडे, भ्रष्टाचार कृती समिती तालुकाध्यक्ष संतोष खांजोडे, युवासेना तालुका समन्वयक नितीन सूरकर यांच्यासह तालुक्यातील अनेकांनी पाठींबा दर्शवला आहे.

वसुरी ग्रामपंचायतीमध्ये मनमानी व हुकुमशाही कारबार चालत असून ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात आहेत. आलेला निधी कुठे खर्च होतो याची मागणी करूनसुद्धा ती दिली जात नाही व विशेषतः ग्रामपंचायत हद्दीतील असलेल्या टीना रबर कंपनीमुळे ग्रामस्थांना त्रास होत असून वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने आम्ही उपोषणाचे हे अस्त्र उचलले आहे.
प्रमोद पाटील
उपोषणकर्ता

comments

About Rajtantra

Scroll To Top