दिनांक 18 December 2017 वेळ 3:04 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » शिवसेना कामाच्या बळावर निवडणूक जिंकेल! आमदार रवींद्र फाटक यांचा विश्‍वास

शिवसेना कामाच्या बळावर निवडणूक जिंकेल! आमदार रवींद्र फाटक यांचा विश्‍वास

प्रतिनिधी
वाडा, दि. 5 : वाडा नगWADA NAGARPANCHAYAT-SHIVSENAरपंचायत निवडणुकीत शिवसेना विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत असून ज्या शहरात भाजपचे पालकमंत्री राहतात तेथे विकासाची काय अवस्था आहे हे मतदार जाणतात. शिवसेनेने ग्रामपंचायतीमध्ये सत्तेत असताना मर्यादित अधिकारात जी विकासकामे करण्याचा प्रयत्न केला त्या बळावर शिवसेना ही निवडणूक जिंकेल, असा विश्वास शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
वाडा नगरपंचायतीची निवडणूक येत्या 13 डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे. त्यापार्श्‍वभुमीवर आमदार फाटक यांनी निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शहरातील काही महत्वाच्या लोकांच्या भेटीगाठी घेण्यावर त्यांनी भर दिला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रमुख विरोधी भाजपवर त्यांनी सडकून टीका केली. वाडा शहरात पालकमंत्री राहतात. ते गेली 28 वर्ष आमदार आहेत. असे असताना येथील नागरी समस्या सोडविण्यात त्यांना अपयश आले हे सर्व जनतेला माहिती आहे, अशी त्यांनी मंत्री सवरांचे नाव न घेता टीका केली. शिवसेना जरी ग्रामपंचायतीमध्ये सत्तेत होती तरी ग्रामपंचायतीला असलेल्या मर्यादित अधिकारात समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधेंनी जी विकासकामे केली आहेत, तेवढी विकासकामे पालकमंत्री करू शकले नाहीत, असा दावाही फाटक यांनी केला.
शिवसेना या निवडणुकीत शहरातील नागरी प्रश्‍न सोडविण्यासाठी विकासाच्या मुद्द्यावरच मतदारांपुढे जात असून बंडखोरी करून काँग्रेस पक्षाकडून उभ्या असलेल्या उमेदवाराचा शिवसेनेच्या विजयावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे म्हणत शिवसेना कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक जिंकेल, असा ठाम विश्वास फाटक यांनी यावेळी व्यक्त केला.

comments

About Rajtantra

Scroll To Top