दिनांक 18 December 2017 वेळ 3:00 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा नगरपंचायत निवडणूक: 2017 भाजपाचे शिवसेनेपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न?

वाडा नगरपंचायत निवडणूक: 2017 भाजपाचे शिवसेनेपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न?

राजतंत्र न्cropped-LOGO-4-Online.jpgयुज नेटवर्क
वाडा, दि. 3: वाडा नगर पंचायतीच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षासह सतरा प्रभागात उमेदवार उभे करून सत्तेचा प्रबळ दावेदार असलेल्या शिवसेने समोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु मागील निवडणूकीची पार्श्वभूमी पहाता भाजप किती प्रमाणात हे आव्हान उभे करेल यासंदर्भात साशंकताच दिसत आहे.
मागील पंधरा वर्षात तीन ग्रामपंचायत निवडणूका भारतीय जनता पक्षाने शिवसेने सोबत युती करून लढवल्या. या निवडणुकांमध्ये शिवसेनेने सतरा पैकी अवघ्या सहा जागा भाजपच्या वाट्याला दिल्या होत्या. मात्र प्रत्येक निवडणूकीत भाजप वाट्याला आलेल्या सहा जागांवरही पक्षाचे उमेदवार उभे करू शकले नाहीत. वाडा हे मंत्री विष्णू सवरा यांचे होमग्राउंड असतांना दरवेळेस वाट्याला आलेल्या अर्धेअधिक उमेदवार्‍या शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना भाजपच्या कोट्यातून देण्याचा बाका प्रसंग त्यांच्यावर ओढवत असे. वाट्याला आलेल्या जागांवरही उमेदवार उभे न करू शकणारी भाजपा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षासह सर्व जागा लढवून आपले नशीब आजमावू पहात आहे.
लोकसभा, विधानसभेतील मोदी लाटेमुळे मिळालेल्या यशामुळे अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा भरणा भाजपमध्ये वाढला आहे. त्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर भाजप वाडा नगर पंचायतीच्या सत्तेची स्वप्ने पहात आहे. परंतु शिवसेनेचं वाडा शहरात नगरा नगरात कार्यकर्त्यांचं असलेल जाळं पाहता शिवसेनेपुढे भाजपचा कितपत टिकाव लागेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषद निवडणूकीतही भाजप शिवसेना स्वतंत्र लढले होते. भाजपने ही निवडणूकदेखील आदिवासी विकास मंत्री सवरांच्या नेतृत्वाखाली लढली होती. परंतु त्यावेळीही भाजपला धोबीपछाड देत शिवसेनेचे निलेश गंधे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यामुळे नगर पंचायत निवडणूकीत भाजपने उभे केलेले आव्हान कितपत यशस्वी ठरते हा येणारा काळच ठरवेल.

comments

About Rajtantra

Scroll To Top