दिनांक 18 December 2017 वेळ 3:03 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणू : बाद उमेदवारप्रकरणी अनिश्‍चितता याचिकेवर आज होणार युक्तीवाद

डहाणू : बाद उमेदवारप्रकरणी अनिश्‍चितता याचिकेवर आज होणार युक्तीवाद

राजतंत्र न्युज नेटवर्क
डहाणू, दि. 3 : डहाणू नगरपरिषदेच्या 13 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छाननीमध्ये बाद झालेल्या उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आता उद्या (4 डिसेंबर) युक्तीवाद होणार आहे. राष्ट्रवादीचे राजेंद्र माच्छी यांच्या आव्हान याcropped-LOGO-4-Online.jpgचिकेमध्ये भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार विशाल नांदलस्कर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्यामुळे 2 डिसेंबर रोजी होणारी सुनावणी टळली होती.
डहाणू नगरपरिषदेच्या 25 नगरसेवक पदांसाठी आणि 1 नगराध्यक्षपदासाठी 13 डिसेंबर रोजी निवडणूक होत असून यासाठी 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. 24 तारखेपर्यंत 133 उमेदवारांनी नगरसेवकपदांसाठी तर 9 उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्रे भरली. यातील नगरसेवक पदांसाठीचे 29 व नगराध्यक्षपदासाठींचे 2 उमेदवारी अर्ज छाननीमध्ये सूचक, अनुमोदक यांची सही नाही, अथवा अन्य विविध कारणांनी बाद ठरविण्यात आले. बाद ठरलेल्या उमेदवारांपैकी 6 जणांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाने व्यथीत होऊन पालघर येथील जिल्हा न्यायालयामध्ये आव्हान याचिका दाखल केल्या. या याचिकांवर (2 डिसेंबर) युक्तीवाद होणार होता.
याचिका करणार्‍यांमध्ये नगरसेवक राजेंद्र माच्छी (राष्ट्रवादी) व सईद शेख (काँग्रेस) यांचादेखील समावेश आहे. प्रभाग क्र. 1 ब मधून उमेदवारी अर्ज भरणारे यशवंत नारायण कडू (भाजप), प्रभाग 9 अ च्या दिपा किसन कणबी (शिवसेना), प्रभाग 10 ब चे ज्ञानेश्‍वर चौधरी (काँग्रेस) व प्रभाग 12 ब च्या राणी महेश पवार (राष्ट्रवादी) हे अन्य याचिकाकर्ते आहेत.
याचिकांवर 29 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये डहाणू नगरपरिषदेतील 12 प्रभागांपैकी याचिकाकर्त्यांच्या 5 प्रभागांच्या निवडणूक प्रक्रीयेला पालघर जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली होती. यामुळे या 5 प्रभागांतील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. अन्य प्रभागांतील उमेदवारांची यादी मात्र प्रसिद्ध करण्यात आली. यादी प्रसिद्ध न झालेल्या प्रभागांमध्ये क्र. 1, 2, 9, 10 व 12 या प्रभागांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक 10 ब मधून छाननीमध्ये बाद झालेल्या राजेंद्र माच्छी यांच्यामुळे भाजपला या प्रभागातील निवडणूक सोपी वाटते. या निकालाचे संधीत रुपांतर करण्यासाठी भाजपचे या प्रभागातील उमेदवार विशाल नांदलस्कर यांनी न्यायालयापुढे अर्ज करुन राजेंद्र माच्छी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याचा निर्णय न फिरवण्याची मागणी केली आहे. याबाबत आता राजेंद्र माच्छी, निवडणूक निर्णय अधिकारी व विशाल नांदलस्कर यांचे वकील 4 डिसेंबर रोजी युक्तीवाद करतील व कदाचित 5 डिसेंबर पर्यंत याप्रकरणी निर्णय येण्याची शक्यता आहे. छाननीमध्ये बाद उमेदवारांना पुन्हा संधी मिळू नये यासाठी प्रभाग क्र. 10 ब मधून भाजपचे उमेदवार न्यायालयाकडे मागणी करीत असताना भाजपचे प्रभाग क्र. 1 ब मधील उमेदवार यशवंत कडू यांनी न्यायालयाकडे अर्ज बाद करु नये यासाठी याचिका केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top