दिनांक 17 February 2020 वेळ 12:04 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017, सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार आले एका व्यासपिठावर! सोशल मिडीयाद्वारे झाले प्रक्षेपण

डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017, सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार आले एका व्यासपिठावर! सोशल मिडीयाद्वारे झाले प्रक्षेपण

राजतंत्र न्युज नेटवर्क cropped-LOGO-4-Online.jpg
डहाणू दि. 3 : डहाणू तालुका विकास परिषदेतर्फे आयोजित डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीत स्वत:चे नशिब अजमावणार्‍या नगराध्यक्षपद व नगरसेवकपदाच्या सर्व पक्षांच्या उमेदवारांना एकाच व्यासपिठावर आणून चर्चा घडवून आणण्याचा कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे मिहीर शहा, भाजपचे भरत राजपूत, शिवसेनेचे संतोष शेट्टी, काँग्रेसचे अशोक माळी, अपक्ष उमेदवार डॉ. अमित नहार व अनिल पष्टे यांनी आवर्जून हजेरी लावली. बहुजन विकास आघाडीचे दिलीप दळवी हे गैरहजर राहीले. कार्यक्रमास सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना देखील बोलाविण्यात आले. राष्ट्रवादी व भाजप या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांचे जवळपास सर्व उमेदवार हजर होते. बाकी पक्षांची उपस्थिती उत्साहवर्धक नव्हती. डहाणूच्या नागरिकांनी मात्र तुडूंब गर्दी केली होती. कार्यक्रमाचे यु ट्युब या सोशल मिडीयाद्वारे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले. सर्व पक्षीयांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
डहाणू शहरातील हॉटेल सरोवरच्या बाजूच्या मैदानावर काल (2 डिसेंबर) रात्री 8 वाजता नियोजीत वेळेवर कार्यक्रम सुरु झाला आणि आदर्श निवडणूक आचारसंहीतेप्रमाणे रात्री 10 वाजता कार्यक्रमाची सांगता झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात उभारलेल्या भव्य व्यासपिठावर हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रम स्थळावर निवडणूक यंत्रणेची तिक्ष्ण नजर होती. पोलीसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला असला तरी लोकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडला. डहाणू शहरातील या कार्यक्रमाचे सोशल मिडीयावरुन थेट प्रक्षेपण झाल्याने अनिवासी डहाणूकरांनी देखील जगभरातून हा कार्यक्रम पाहिला.
नगराध्यक्ष व नगरसेवकपदांच्या उमेदवारांचा कस लावणार्‍या या कार्यक्रमात केवळ उमेदवारांना प्रश्‍नोत्तरे करण्याची संधी देण्यात आली. चर्चेच्या व आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांनाच रात्रीचे 10 वाजले. आणि कार्यक्रम लवकर संपू नये अशी उपस्थितांची इच्छा असताना राष्ट्रगिताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

comments

About Rajtantra

Scroll To Top