दिनांक 18 December 2017 वेळ 3:09 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू : छाननीमध्ये बाद उमेदवारप्रकरणी याचिकेवर आज होणार युक्तीवाद

डहाणू : छाननीमध्ये बाद उमेदवारप्रकरणी याचिकेवर आज होणार युक्तीवाद

डहाणू दिनांक 1: डहाणू नगरपरिषदेच्या 13 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छाननीमध्ये बाद झालेल्या उमेदवारांनी दाखल केलेल्या याLOGO 4 Onlineचिकेवर आज युक्तीवाद होणार आहे. डहाणू नगरपरिषदेच्या 25 नगरसेवक पदांसाठी आणि 1 नगराध्यक्षपदासाठी 13 डिसेंबर रोजी निवडणूक होत असून यासाठी 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. 24 तारखेपर्यंत 133 उमेदवारांनी नगरसेवकपदांसाठी तर 9 उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्रे भरली. यातील नगरसेवक पदांसाठीचे 29 व नगराध्यक्षपदासाठींचे 2 उमेदवारी अर्ज छाननीमध्ये विविध कारणांनी बाद ठरविण्यात आले. बाद ठरलेल्या उमेदवारांपैकी 6 जणांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाने व्यथीत होऊन पालघर येथील जिल्हा न्यायालयामध्ये आव्हान याचिका दाखल केल्या असून या याचिकांवर आज (2 डिसेंबर) युक्तीवाद होणार आहे. याचिका करणार्‍यांमध्ये नगरसेवक राजेंद्र माच्छी (राष्ट्रवादी) व सईद शेख (काँग्रेस) यांचादेखील समावेश आहे. प्रभाग क्र. 1 ब मधून उमेदवारी अर्ज भरणारे यशवंत नारायण कडू (भाजप), प्रभाग 9 अ च्या दिपा किसन कणबी (शिवसेना), प्रभाग 10 ब चे ज्ञानेश्‍वर चौधरी (काँग्रेस) व प्रभाग 12 ब च्या राणी महेश पवार (राष्ट्रवादी) हे अन्य याचिकाकर्ते आहेत. याचिकांवर 29 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये डहाणू नगरपरिषदेतील 12 प्रभागांपैकी याचिकाकर्त्यांच्या 5 प्रभागांच्या निवडणूक प्रक्रीयेला पालघर जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे आज या 5 प्रभागांतील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. अन्य प्रभागांतील उमेदवारांची यादी मात्र प्रसिद्ध करण्यात आली. यादी प्रसिद्ध न झालेल्या प्रभागांमध्ये क्र. 1, 2, 9, 10 व 12 या प्रभागांचा समावेश आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top