दिनांक 18 December 2017 वेळ 3:07 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू : सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार एका व्यासपिठावर येणार कार्यक्रमाचे सोशल मिडीयाद्वारे Live प्रक्षेपण

डहाणू : सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार एका व्यासपिठावर येणार कार्यक्रमाचे सोशल मिडीयाद्वारे Live प्रक्षेपण

राजतंत्र न्यूज नेटवर्क
डहाणू दि. 30 : डहाणू तालुका विकास परिषदेतर्फे नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवकपदासाठी निवडणूक लढविणार्‍या सर्व पक्षांच्या उमेदवारांना आज (2 डिसेंबर) facebook_1506002192949एकाच व्यासपिठावर आणून चर्चा घडवून आणण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाविषयी लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. याआधी देखील परिषदेतर्फे नगरसेवकांशी नागरिकांचा संवाद घडवून आणणारा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर आजचा कार्यक्रम लाईव्ह करण्यात येणार असून लोकांना तो ुुु.ीरक्षींरपींीर.लेा या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
डहाणू शहरातील हॉटेल सरोवरच्या बाजूच्या मैदानावर होणारा हा कार्यक्रम रात्री 8 वाजता वेळेवर सुरु होणार असून रात्री 10 वाजता समारोप होणार आहे. यासाठी पोलीस प्रशासन व निवडणूक यंत्रणेकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमामध्ये डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे सर्व 7 उमेदवार व्यासपिठावर असतील. त्यांच्यासमोर निवडणूकीच्या रिंगणात नगरसेवकपदासाठी उतरलेले 104 उमेदवार असतील. दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी हे उमेदवारांना नागरिकांच्या वतीने प्रश्‍न विचारतील. या उमेदवारांची पक्षनिहाय बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार डहाणू शहराच्या विकासाबाबत त्यांच्या योजना मांडतील. नगरसेवकपदाचे कुठल्याही पक्षाचे उमेदवार कुठल्याही पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांशी प्रश्‍नोत्तरे करु शकतील. डहाणू शहरात अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असून या कार्यक्रमाविषयी लोकांची उत्कंठा शिगेला पोचली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top