दिनांक 18 December 2017 वेळ 3:01 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा नगरपंचायत निवडणूक : काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला

वाडा नगरपंचायत निवडणूक : काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला

प्रतिनिधी
वाडा, दि. 1 : वाडा नगरपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून काँग्रेस पक्षाने शुक्रवारी काँग्रेस भवनासमोरील गणेश मंदिरात नारळ वाढवून काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सुWADA NAGARPANCHAYAT NIVADNUK-CONGRESS PRACHARभाष कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराला सुरुवात केली.
या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार सायली पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. तर नगरसेवक पदाच्या 17 पैकी 12 जागांवर पक्षीय चिन्हावर निवडणूक लढवित असून उर्वरित जागांवर मनसे व अपक्षासोबत आघाडी केली आहे. आज वाडा शहरातील ग्रामदैवतांसह अन्य मंदिरामध्ये जाऊन तसेच परळीनाका येथील दर्ग्यावर चादर चढवून काँग्रेसने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. यानंतर संपूर्ण वाडा शहरातून प्रचारफेरी काढण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष केदार काळे, माजी खासदार दामोदर शिंगडा, ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे, प्रदेश चिटणीस मनिष गणोरे, अल्पसंख्यक सेलचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा मेमन, उपाध्यक्ष इरफान सुसे, तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा दर्शना भोईर, शहराध्यक्ष सुशील पातकर आदी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top