दिनांक 23 January 2018 वेळ 3:24 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विक्रमगड : कोतवालाला मारहाण कर्मचार्‍यांकडून काळ्या फिती लावून निषेध

विक्रमगड : कोतवालाला मारहाण कर्मचार्‍यांकडून काळ्या फिती लावून निषेध

प्रतिनिधीKOTVAL MARHAN
विक्रमगड, दि. 1 : आधारित मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत पालघर येथे आयोजित सभेस अनुपस्थित राहिलेल्या शिक्षकास नोटीस बजावण्यास गेलेल्या तलवाडा सजेच्या कोतवालास सदर शिक्षकाने मारहाण केली होती. त्यामुळे तहसिल कार्यालयातील कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून या मारहाणीचा निषेध व्यक्त केला.
14 नोव्हेंबर रोजी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस गैरहजर राहिलेल्या केंद्रस्तरीय अधिकार्‍यांना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेकडून संबधित तहसिलदार कार्यालयांमार्फत नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तलवाडा सजेचे कोतवाल किरण मागी तलवाडाचे केंद्रस्तरीय अधिकारी तलवाडा आश्रमशाळेतील शिक्षक योगेश सिताराम बरफ यांना नोटीस बजावण्यासाठी गेले असता त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. त्यामुळे मागी यांनी त्यांच्याकडे नोटीस न घेण्याचे लेखी उत्तर मागितले असता शिक्षक योगेश बरफ यांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ विक्रमगड तहसिल कार्यालयाच्या कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून आपला निषेध नोंदवला तसेच सदर शिक्षकावर कारवाई होण्यासंदर्भात विक्रमगड तहसीलचे नायब तहसिलदार एस. के. कामडी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान याप्रकरणी योगेश बरफ यांच्यावर विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top