दिनांक 23 January 2018 वेळ 3:30 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार : जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली व पथनाट्याद्वारे जनजागृती

जव्हार : जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली व पथनाट्याद्वारे जनजागृती

AIDS DIN-JAVHARप्रतिनिधी :
जव्हार, दि. 01 : एड्ससारख्या भीषण आजाराबाबत समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी. तसेच या रोगाचा प्रसार कसा होतो, या रोगाची लक्षणे व त्यावर उपाय काय आहेत याबाबत नागरीकांना माहिती मिळावी या उद्देशाने श्री गजानन महाराज कॉलेज ऑफ नर्सिंग रिसर्च सेंटर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहरात रॅली काढली. तसेच पंतगशहा रुग्णालय परिसरात जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. यावेळी जव्हारचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास मराड, आय.सी.टी.सी.चे समुपदेशक सुनील महाजन, मनीषा वराडे, सचिन देवकर, श्री गजानन नर्सिंग महाविद्यालयाच्या शिक्षिका वंदना बोरनारे, रितू दुसिंग, प्रल्हाद भरसट व इतर रुग्णालयातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top