दिनांक 23 February 2018 वेळ 12:16 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » एका व्यासपिठावर येणार डहाणू तालुका विकास परिषदेचा उपक्रम

एका व्यासपिठावर येणार डहाणू तालुका विकास परिषदेचा उपक्रम

राजतंत्र न्यूज नेटवर्कWADA NAGARPANCHAYAT LEKH 1 Pic1
डहाणू दि. 30: येत्या 13 डिसेंबर रोजी डहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. या निवडणूकीमध्ये लोकशाहीला पोषक वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने डहाणू तालुका विकास परिषदेतर्फे नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवकपदासाठी निवडणूक लढविणार्‍या सर्व पक्षांच्या उमेदवारांना 2 डिसेंबर रोजी एकाच व्यासपिठावर आणून चर्चा घडवून आणण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाविषयी लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. या आधी देखील परिषदेतर्फे नगरसेवकांशी नागरिकांचा संवाद घडवून आणणारा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
डहाणू शहरातील हॉटेल सरोवरच्या बाजूच्या मैदानावर रात्री 8 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमामध्ये डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे 7 उमेदवार व्यासपिठावर असतील. त्यांच्यासमोर निवडणूकीच्या रिंगणात नगरसेवकपदासाठी उतरलेले 104 उमेदवार असतील. दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी हे उमेदवारांना नागरिकांच्या वतीने प्रश्‍न विचारतील. या उमेदवारांची पक्षनिहाय बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार डहाणू शहराच्या विकासाबाबत त्यांच्या योजना मांडतील. नगरसेवकपदाचे कुठल्याही पक्षाचे उमेदवार कुठल्याही पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांशी प्रश्‍नोत्तरे करु शकतील. डहाणू शहरात अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असून या कार्यक्रमाविषयी लोकांची उत्कंठा शिगेला पोचली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top