दिनांक 23 January 2018 वेळ 3:29 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मोखाडा : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

मोखाडा : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

प्रतिनिधी MOKHADA SHAISHANIK SAHITYA
मोखाडा, दि. 30 : रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना श्री तुंगारेश्‍वर महादेव सेवा समिती, भाईंदर यांच्यावतीने मोफत वह्या व इतर शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी तुंगारेश्वर महादेव सेवा समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे देणगी समिती प्रमुख तथा माध्यमिक शिक्षक तुकाराम लोंढे यांनी केले. आश्रमशाळा विभागाचे प्रकल्प अधिकारी पांडुरंग सोलंकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर उपस्थित मान्यवरांचा सत्कार सहाय्यक प्रकल्प अधिकारी तथा शाळेचे प्राचार्य अर्जुन शेळके व प्राथमिक मुख्याध्यापक हरी पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर श्री तुंगारेश्‍वर महादेव सेवा समितीचे पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते इ. 8 वी ते इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन वाटप करण्यात आले. तसेच आश्रमशाळेत रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा व क्रीडा स्पर्धा घेऊन विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन शिवछत्रपती समाज सेवा मंडळ, ज्युचंद्र नायगाव, वसई यांच्यामार्फत करण्यात आले होते. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top