दिनांक 18 December 2017 वेळ 3:09 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हारमध्ये निवडणूक निरीक्षकांची पाहणी; निवडणूक कामाची लगबग सुरू

जव्हारमध्ये निवडणूक निरीक्षकांची पाहणी; निवडणूक कामाची लगबग सुरू

प्रतिनिधी JAVHAR NIVADNUK PAHANI
जव्हार, दि. 30 : जव्हार नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असुन जसजशी निवडणूकीची तारीख (13 डिसेंबर) जवळ येत आहे. तसतशी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. निवडणूक निरीक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी (जव्हार मुख्यालय) सतिष देशमुख यांनी काल, बुधवारी सर्व मतदान केंद्रांना भेटी दिल्या. तसेच प्रभाग, हद्दी, कायदा व सुव्यवस्था, दारूबंदी, निवडणूक साहित्य याविषयी माहिती घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पवनीत कौर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव विधाते, जव्हार तहसीलदार संतोष शिंदे हे उपस्थित होते.
या निवडणूकीत स्ट्रॉँग रूम, मतदान यंत्रे, सिलींग व मतमोजणी प्रक्रिया आदिवासी भवन येथे होणार असल्यामुळे याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी कौर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विधाते व तहसीलदार शिंदे यांच्याकडून आढावा घेण्यात आला. तसेच मतदान पथकांची नियुक्ती व प्रशिक्षण यांची माहिती घेऊन, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या निवडणूकीकरीता केंद्रावरील कर्मचारी, स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक, व्हिडीओ तपासणी पथक, व्हिडीओ चित्रीकरण पथक व आचार संहिता तक्रार निवारण कक्षाकरीता 200 ते 250 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार शिंदे यांनी दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top