दिनांक 18 December 2017 वेळ 2:56 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » हंगर लघुपटाचा आंतराष्ट्रीय स्तरावर सन्मान योगिनी सुर्वे दिग्दर्शित लघुपटाला हॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार जाहीर

हंगर लघुपटाचा आंतराष्ट्रीय स्तरावर सन्मान योगिनी सुर्वे दिग्दर्शित लघुपटाला हॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी
पालघर, दि. 30 : राज्यातील पालघर या कुपोषणग्रस्त जिल्ह्यातील दारिद्य्र आणि भुकेचे विदारक वास्तव मांडणार्‍या हंगर या लघु माहितीपटाला हॉलिवूड इंटरनॅशनलचा यावर्षीचा सर्वोत्कृष्ट लघुपट (इशीीं डहेीीं षळश्रा ेष ींहश ूशरी- 2017 ) हा जागतिक दर्जाचा पुरस्कार जाHUNGERहिर झाला आहे. योगिनी सुर्वे यांनी या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
हंगर हा माहितीपट भुकेभोवती फिरतो. भारतात जिथे दर अर्ध्या मिनिटांला एक मुल भुकेमुळे दगावते त्या देशातील कुपोषणाने होणार्‍या बालमृत्यूचा दुर्दैवी विक्रम करणार्‍या महाराष्ट्रातील पालघर या आदिवासी बहुल जिल्ह्यातील भुकेच वास्तव सांगणारा हा माहितीपट आहे. या माहितीपटाला आजवर 6 आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल्समध्ये पुरस्कार मिळाले असुन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव न्यूयॉर्क आणि हॉलिवूड इंटरनॅशनल मुविंग फिल्म फेस्टिवल या दोन अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या महोत्सवात या लघुपटाला पुरस्कार मिळाले आहेत.
पालघर जिल्ह्यातील एका संवेदनशिल दिग्दर्शकीने दिग्दर्शित केलेल्या या लघुपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अमरिकेतील लास एंजिलिस या ठिकाणी 27 जानेवारी 2018 रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या चित्रपटाचे निर्माता विशाल वासू असून कौशल गोस्वामी यांनी या लघुपटाचे चित्रीकरण केले आहे. तर उमेश ढोबळे यांनी एडिटिंग केले आहे. या लघुपटाच्या माध्यमातून कुपोषणग्रस्तांचे चित्र जगासमोर मांडता आले. मिळालेल्या पुरस्काराचा आनंद असला तरी या समस्येचे समूळ उच्चाटन झाल्यास अधिक आनंद होईल, असे दिग्दर्शिका सुर्वे म्हणाल्या. त्याचप्रमाणे या लघुपटासाठी श्रमजीवी संघटना व समर्थनच्या कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top