दिनांक 18 December 2017 वेळ 3:09 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » आदिवासींबाबत आक्षेपार्ह विधान करणार्‍या आकांक्षा तांबेंच्या पुतळ्याचे दहन

आदिवासींबाबत आक्षेपार्ह विधान करणार्‍या आकांक्षा तांबेंच्या पुतळ्याचे दहन

प्रतिनिधी
मोखाडा, दि. 30 : आAAKANSHA TAMBEदिवासी समाजाने काढलेल्या मोर्चाचे फेसबुक लाइव्ह करत आदिवासींबाबत आक्षेपार्ह विधान करणार्‍या आकांक्षा तांबे या महिलेचा निषेध म्हणून आज खोडाळ्यात निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी खोडाळा चौफूली ते पोलीस दुरक्षेत्रापर्यंतचा परिसर आदिवासी एकजुटीच्या आणि आकांक्षा तांबे विरूध्दच्या घोषणांनी दुमदुमला होता. या निषेध रॅलीचा शिवाजी चौकात समारोप करून आकांक्षा तांबेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
27 नोव्हेंबर रोजी विरारमध्ये आदिवासींच्या मागण्यांसंदर्भात मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा विरार पश्चिमेकडून उड्डाणपुलावरून पूर्वेला आला. या मोर्चात 1 हजार आदिवासी बांधव सहभागी झाले होते. या मोर्चाचे फेसबुक लाइव्ह करत विरारमध्येच पश्चिमेला राहणार्‍या आकांक्षा तांबे यांनी आक्षेपार्ह विधानं केली. यामुळे संतापलेल्या आदिवासी समाजाने आकांक्षा तांबेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त केला. मोखाडा सभापती प्रदीप वाघ यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या रॅलीत खोडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर पाटील, माजी उपसभापती मधुकर डामसे, ठाकुर समाज अध्यक्ष भगवान फसाळे, महादेव कोळी, समाज सरचिटणीस प्रदीप वारघडे, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत हमरे, सदानंद हमरे आणि बहूसंख्य आदिवासी बांधव सहभागी झाले होते. दरम्यान, याप्रकरणी आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी विरार पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आकांक्षा तांबे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 चे कलम 3(1)(थ),सह भादंविस कलम 505(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top