दिनांक 23 January 2018 वेळ 3:20 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » नवोदित कवींनी सामाजिकदृष्टया संवेदनशील असावं ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांनी कविसंमेलनात मांडले मत

नवोदित कवींनी सामाजिकदृष्टया संवेदनशील असावं ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांनी कविसंमेलनात मांडले मत

प्रतिनिधी
पालघर, दि. 28 : लेखन ही चळवळ आहे व त्यासाठी KAVI SAMMELAN1कवींनी समजाभिमुख लेखन केल्यास समस्यांना वाचा फुटेल; पण त्यासाठी नवोदित कवींनी संवेदशील असावं असं मत प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक सायमन मार्टिन यांनी पालघर येथे शब्दशिल्पच्या कविसंमेलनात व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पालघर व बोईसर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नवोदित कविंकरिता काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्टिन बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अ. ना. रसनकुटे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत, लेखक धोंडू पेडणेकर, शब्दमशालचे संपादक शरद पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या काव्यसंमेलनात जवळपास साठ नवोदित कवींनी आपल्या कविता सादर केल्या. यामध्ये संतोष संख्ये यांची नखे, नम्रता माळीपाटील यांची थोडी गडबड होते, योगेश गोतारणे यांची बळीराजा, उल्का संख्ये यांची जरा वळून पहा रायगड रडतोय, डॉ. धर्माजी खरात यांची देवा मला पास कर, स्वाती भोईर यांची ड्यूटी अन्, नेत्रा राऊत यांची लेटगाडी लोटगाडी, मनीष पाटील यांची गं साजणी तर सुनील म्हात्रे यांची हिवाळा आदी कविता ऐकताना श्रोतेगण मंत्रमुग्ध झाले. सर्व उपस्थित नवोदित कवींनी प्रोत्साहनपर प्रमाणपत्र व सन्मानपत्र देण्यात आले. पुस्तक प्रकाशित झालेल्या कवींना शब्दशिल्प साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये शिल्पा पै, संजय पाटील, नम्रता पाटील, जितेंद्र वडे, अक्षय देवरे आदींचा समावेश होता. याच कार्यक्रमात संध्या सोंडे यांचा अंतर्नाद-मनाच्या अंतरंगाची साद हा काव्यसंग्रह व उदय संख्ये यांच्या शिवप्रताप या पुस्तकाचे प्रकाशन कवी सायमन मार्टिन यांच्या हस्ते करण्यात आले.

comments

About Rajtantra

Scroll To Top