दिनांक 23 January 2018 वेळ 3:21 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला जिल्हा परिषदेच्या विकास कामांचा आढावा

कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला जिल्हा परिषदेच्या विकास कामांचा आढावा

पालघर, दि. 27 : कोकण विभागीय आKOKAN VIBHAGIY VIKAS KAAM AADHAVAयुक्त जगदिश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पालघर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सन 2014-15, 2015-16 व 2016-17 च्या सर्वसाधारण तपासणीचे निरिक्षण टिपणीचे वाचन आणि पुर्तता अहवाल याबाबत सर्व खाते प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, कोकण विभागीय उपायुक्त गणेश चौधरी (आस्थापना) तसेच माणीक दिवे (विकास), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पवनीत कौर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जेजुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) देवऋषी, तसेच ग्रामपंचायत विभाग, पाणी व स्वच्छता विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, समाजकल्याण विभाग, वित्त विभाग, मगांरोहयो विभाग, कृषी विभाग, लघु पाटबंधारे विभाग, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग (प्राथ. व माध्य.) आदी विभागाचे खातेप्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top