दिनांक 23 January 2018 वेळ 3:24 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या अध्यक्षपदी अजय ठाकूर यांची निवड

सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या अध्यक्षपदी अजय ठाकूर यांची निवड

प्रतिनिधी SOMVANSHI SAMAJ-AJAY THAKUR
पालघर, दि. 27 : सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अजय ठाकूर यांची संघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाची 97 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दादर येथील अण्णासाहेब वर्तक स्मारक सभागृहात संघाचे मावळते अध्यक्ष विलास चोरघे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत सन 2017 ते 2020 या कालावधीसाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी पालघर तालुक्यातील माहीम येथील यशवंत ठाकूर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या स्थापनेला 97 वर्षे झाली असून ते संघाचे 19 वे अध्यक्ष ठरले आहेत. ठाकूर हे सामाजिक कार्याची जाणीव व आवड असलेले, कणखर, आक्रमक व तितकेच सर्वांना घेऊन चालणारे अशा स्वभावाचे असल्याने त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या माध्यमातून सुरू असलेले सर्व उपक्रम अधिक क्षमतेने राबवणार असून संघाची शताब्दी वर्षाकडे वाटचाल होत असताना संपूर्ण समाज जोडण्याचे महत्वपूर्ण काम करणार असल्याचे ठाकूर यांनी निवडीनंतर सांगितले.
यावेळी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्ष म्हणून विनोद चुरी, स्वाती चौधरी, अमृता चोरघे, खजिनदार धनेश वर्तक चिटणीस नितिन सावे, प्रवीण पाटील, प्रफुल्ल म्हात्रे, जगन्नाथ पाटील या पदाधिकार्‍यांची एकमताने निवड करण्यात आली.

comments

About Rajtantra

Scroll To Top