दिनांक 18 December 2017 वेळ 3:00 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » वृक्षवल्ली म्हणजे गावाच्या प्रगतीचे द्योतक कोकाकोला कंपनीचे व्यवस्थापक हिमांशु आचार्य यांचे प्रतिपादन

वृक्षवल्ली म्हणजे गावाच्या प्रगतीचे द्योतक कोकाकोला कंपनीचे व्यवस्थापक हिमांशु आचार्य यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी : cropped-LOGO-4-Online.jpg
कुडूस, दि. 26 : वृक्षवल्ली आपल्याला सगे सोयर्‍यासारखे आहेत, हे संतानीच म्हटले आहे. मात्र वृक्षामुळेच मानवाचे जीवन आरोग्यदायी बनले आहे. आज वृक्षवल्ली म्हणजे गावाच्या प्रगतिचे द्योतक आहे. याची जाणीव ठेवून आपण मोठ्या संख्येने झाडे लावली पाहिजेत व वाढविली पाहिजेत, असे आवाहन कोकाकोला कंपनीचे व्यवस्थापक हिमांशु आचार्य यांनी केले.
कोकाकोला कंपनीकडून कुडूस ग्रामपंचायतीला वृक्षारोपणासाठी 7 हजार वृक्ष देण्यात आले आहेत. या वृक्षारोपण उपक्रमाचे उद्घाटन आचार्य यांच्या हस्ते पष्टे कॉम्प्लेक्सच्या मोकळ्या जागेत रोपांची लागवड करुन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आमच्या कंपनीकडून कुडूस परिसरातील सापरोंडे, मांगाठणे, दिनकरपाडा, कोंढले, वसुरी, खानिवली, गौरापूर, बिलोशी, आंबिस्ते व देवघर आदी ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात वृक्षारोपणासाठी 7 हजार वृक्ष देण्यात आले असून त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीकडे सोपविली आहे. यावेळी त्यांनी झाडांचे महत्व पटवून दिले. कुडूस ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल या कंपनीचे आभार मानले.
हिंदूस्थान कोकाकोला कंपनीकडून झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात कुडूस ग्रामपंचायत, डॉ. गिरीश चौधरी प्रतिष्ठान, साईकृपा नर्सरी गार्डन व महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळ यांनी विशेष सहभाग घेतला. यावेळी कुडूस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच इरफानभाई सुसे, विद्यमान सरपंच छबीताई तुंबडे, सदस्य दामोदर डोंगरे, सचिन भोईर, कैलास चौधरी व कोकाकोला कंपनीचे श्रीकांत गिर, प्रशांत नेवरेकर, विपुल गुप्ता व सुर्यकांत जगधने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गिरीश चौधरी यांनी केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top