दिनांक 18 December 2017 वेळ 2:59 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » विक्रमगड तालुक्यातील अंगणवाडीमधील कुपोषित मुलांना स्वेटर व खजूर वाटप

विक्रमगड तालुक्यातील अंगणवाडीमधील कुपोषित मुलांना स्वेटर व खजूर वाटप

प्रतिनिधी : KUPOSHIT MUL
विक्रमगड, दि. 26 : पालघर जिल्ह्यातील कुपोषण दुर करण्यासाठी शासन अनेक योजना राबवत असतानाच विविध सामाजिक संस्थाही जिल्ह्याला कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या संस्था आदिवासी भागात कुपोषित बालकांसाठी विविध उपक्रम राबवित असुन याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील खेडो-पाड्यातील सॅम श्रेणीमध्ये मोडणार्‍या 100 मुलांना मुंबईतील मालाड येथील श्री. रामदेव पिर संस्थेने थंडीपासून बचावासाठी स्वेटर व रक्त वाढीसाठी अर्धा किलो खजूर वाटप केले. विक्रमगड पंचायत समिती सभा हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमास पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी कामडी, सर्व मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका तसेच जिल्हा परिषद सदस्या सिंधू भोये व श्री. रामदेव पिर संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top