दिनांक 18 December 2017 वेळ 2:59 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » ग्रामीण मागास भागात रूग्णांची सेवा करणार्‍या डॉक्टरांची नितांत गरज! -विश्वनाथ पाटील

ग्रामीण मागास भागात रूग्णांची सेवा करणार्‍या डॉक्टरांची नितांत गरज! -विश्वनाथ पाटील

प्रतिनिधी : cropped-LOGO-4-Online.jpg
कुडूस, दि. 26 : आज मोठ्या संख्येने तरूण वैद्यकीय क्षेत्रात वळत आहेत. मात्र हे तरुण मोठ्या पदव्या घेऊन शहरात प्रक्टिस करतात. त्यामुळे ग्रामीण मागास भागातील रुग्णांचे मोठे हाल होत असुन त्यांना पैसे खर्च करुन शहरात उपचारासाठी जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रूग्णांची सेवा करणार्‍या डॉक्टरांची नितांत गरज असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केले.
कुडूस येथील रहिवासी अहमद पटेल यांनी डेंटीसची एम.डी. एस. ही पदवी धारण करून ग्रामीण भागातील उच्च पदवी धारण करणारा तरूण म्हणून लौकिक मिळविला आहे. त्यांनी येथील रुग्णांची सेवा करण्याच्या उद्देशाने दंतचिकित्सा हॉस्पिटल सुरु केले असुन या हॉस्पिटलचे
उद्घाटन डॉ. सुल्तान शौकत अली (गोल्डमेडॅलिस्ट) यांच्या हस्ते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ पाटील यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते. उच्च पदवी घेऊन शहरात प्रक्टिस करण्याचे स्वप्न ठेवणार्‍यांना डॉ. अहमद अयुब पटेल यांचा अपवाद असावा. एम.डी. सारखी उच्च पदवी घेऊन त्यांनी गरीब व गरजू रूग्णांची सेवा करण्याचे व्रत घेतले आहे, असे कौतुकास्पद उद्गार त्यांनी यावेळी काढले. वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर खेड्यात दवाखाना न काढता शहरी भागात व्यवसाय करणे पसंत करत असल्याने ग्रामीण भागातील रूग्णांना पैसा खर्च करून शहरातील डॉक्टरांकडे उपचारासाठी जावे लागते. मात्र अहमद पटेल यांनी खेडूतांची सेवा करण्याचे व्रत घेतल्याने कुडूस परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते परशुराम सावंत, नॅशनल इंग्लीश स्कूलचे संस्थाचालक मुस्तफा मेमन, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते मधुकरराव पाटील, पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती धनश्री चौधरी, ग्रामपंचायत सदस्य रमेश राथड, सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील, निखिल दिवान, डॉ. नमीर डोम तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय्रक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद अडकमोल सर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नुमान पटेल यांनी विशेष मेहनत घेतली.

comments

About Rajtantra

Scroll To Top