दिनांक 18 December 2017 वेळ 2:59 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » कोकण विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांचे पालकमंत्री विष्णू सवरांच्या हस्ते उद्घाटन

कोकण विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांचे पालकमंत्री विष्णू सवरांच्या हस्ते उद्घाटन

पालघर, दि. 26 : राज्य शासनाचा महसूल विभाग हा जनसामान्यांशी निगडीत असल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी उत्साही व चतु:रस्त्र असावे, हा उत्साह व चतु:रस्त्रपणा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमुळे येत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास तथा पालक मंत्रीKRIDA SPARDHA1 विष्णू सवरा यांनी केले.
काल, शनिवारी कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2017-18 चे उद्घाटन आदिवासी विकास तथा पालक मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते विरार पश्‍चिमेतील विवा कॉलेज ग्राऊंड येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वसई-विरार महापालिकेच्या महापौर प्रविणा ठाकूर, आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, विलास तरे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदिश पाटील, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी, सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी विजेंद्रसिंह कुशवाह, पोलीस अधिक्षक मंजूनाथ सिंगे, सिने अभिनेते मनोज जोशी, भाऊ कदम तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी खेळाडू उपस्थित होते. यावेळी सवरा म्हणाले की, व्यक्तीचे शरीर जर चांगले असेल तर, सगळ्या गोष्टी चांगल्या करता येतात. महसूल विभागात काम करताना शरीर व मन सुदृढ असणे महत्त्वाचे आहे. यासाठी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. येथे आलेल्या सातही जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी खेळाडूंचे स्वागत करुन स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो, असे सवरा म्हणाले.
यावेळी विभागीय आयुक्त पाटील म्हणाले की, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा या दैनंदिन ताण-तणाव कमी करण्यासाठी उपयोगी आहेत. तसेच दरवर्षी होणार्‍या या स्पर्धांचा दर्जा उंचावत आहे. प्रास्ताविकामध्ये डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये नव चैतन्य प्राप्त करण्यासाठी या स्पर्धा उपयोगी पडणार आहेत.
कोकण महसूल विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत कबड्डी, हॉलीबॉल, क्रिकेट, फूटबॉल, खो-खो, बॅडमिंटन, टेबलटेनिस, बुध्दीबळ, कॅरम, थ्रो बॉल, रिंग टेनिस, पोहणे, रिले, धावणे, जलद चालणे, उंच उडी, लांब उडी, भाला फेक, गोळा फेक, थाळी फेक इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top