दिनांक 18 December 2017 वेळ 2:59 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » पत्रकार हनीफ शेख यांना समर्थनचा मानवी हक्क वार्ता पुरस्कार

पत्रकार हनीफ शेख यांना समर्थनचा मानवी हक्क वार्ता पुरस्कार

प्रतिनिधी HANIF SHAIKH
मोखाडा, दि. 26 : मोखाडा तालुक्यातील दै. पुढारीचे वार्ताहर हनीफ शेख यांना समर्थनचा मानवी हक्क वार्ता पुरस्कार जाहिर झाला असून लवकरच मुंबई येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समर्थन कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
एक पाववाला म्हणून ओळख घेऊन मिरवणारी हनीफ शेख सारखी व्यक्ती अल्पावधीत एक चांगल्या प्रतिचा सृजनशिल पत्रकार म्हणून यश मिळवतो ही गोष्ट निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. त्यामूळे समर्थनने मानवी हक्क वार्ता पुरस्कारासाठी हनीफ शेख यांची सत्पात्री निवड केली असल्याची प्रतिक्रिया मोखाड्यातुन ऐकायला मिळत आहे. हनीफ शेख यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीतुन वाट काढली आहे. अक्षरशः पाव विकून त्यांनी वृत्तपत्र विद्येचे शिक्षण पुर्ण केले. या दरम्यान त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील एका स्थानिक वर्तमानपत्रामध्ये कार्यकारी संपादक पदाची धुरा अतिशय जबाबदारीने सांभाळली आहे. दै. पुढारीमधून ते मागील दहा वर्षांपासून कुपोषण, आश्रमशाळा, पाणीटंचाई आदि वैविध्यपुर्ण सामाजिक व लोकहितैषी लिखान करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top