दिनांक 18 December 2017 वेळ 2:58 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » उमेश खिराडे यांचा स्वच्छता पुरस्काराने सन्मान

उमेश खिराडे यांचा स्वच्छता पुरस्काराने सन्मान

प्रतिनिधीUMESH KHIRADE
वाडा, दि. 26 : वाडा पंचायत समिती व जायंट्स ग्रुप ऑफ वाडा वैतरणा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात वर्षभर राबविण्यात आलेले स्वछते विषयक उपक्रम, स्त्रीभ्रुण हत्या व स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराविरुद्ध जनजागृती-व्याख्याने, लेक वाचवा लेक शिकवा महारॅली अशा विविध उपक्रमाद्वारे उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते उमेश खिराडे यांना स्वच्छता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. जायंट्स इंटरनॅशनल फेडरेशनच्या वतीने डोंबिवली येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या प्रसंगी अपर्णा हुक्केरी अध्यक्ष पी.जे.जोशी वर्ल्ड चेअरमन, नुरुद्दीन शेववाला डेप्युटी वर्ल्ड चेअरमन, अशोक हुक्केरी अवॉर्ड चेअरमन, शुभांगी शिंद्रे मिस इंडिया 2017 इत्यादी उपस्थित होते.

खिराडे हे तालुक्यातील अतिदुर्गम भागातील उजैनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.खिराडे यांना तब्बल चार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top