दिनांक 13 November 2018 वेळ 9:52 PM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » डहाणू नगरपालिका; दिशा आणि दशा ! विशेष लेख, भाग 3 – संजीव जोशी

डहाणू नगरपालिका; दिशा आणि दशा ! विशेष लेख, भाग 3 – संजीव जोशी

भ्रष्ट्राचाराच्या विळख्यात,
डहाणू नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना!
डहाणू नगfacebook_1506002192949रपरिषदेच्या नगराध्यक्षा रमिला पाटील यांच्या कार्यकाळात स्वच्छ महाराष्ट्र अभियान व घनकचरा व्यवस्थापनासाठी 14 व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेला निधी डहाणू नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील घोटाळा दाबण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. या निधीतून डहाणू शहरातील समुद्रकिनार्‍यावर व अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधता आली असती आणि डहाणू नगरपरिषदेवर शाळांची स्वच्छतागृहे लोकांना उपलब्ध करुन देण्याची वेळ आली नसती. या कामात रमिला पाटील यांना भाजपचे सहकार्य लाभल्याने त्या भाजपच्या प्रेमात पडल्या.
डहाणू नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेत जवळपास 6 कोटीपेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचे स्पष्ट होत असताना भाजपचे याबाबतचे आरोप केवळ राजकीय स्टंट असल्याचे समोर आले आहे. कारण एकीकडे भाजपाचे खासदार चिंतामण वणगा आणि आमदार पास्कल धनारे या पाणीपुरवठा योजनेची किंमत कोट्यावधी रुपयांनी वाढवून भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करीत असताना आणि या प्रकरणी पालघरच्या जिल्हाधिकारी यांनी दिनांक 8 डिसेंबर 2016 रोजी नगरविकास विभागाला (नगरविकास विभागाचा कार्यभार मा. मुख्यमंत्र्यांकडेच आहे) स्पष्ट अहवाल पाठवला असताना याबाबत काहीही कारवाई होणे दुरच राहीले. उलट हे प्रकरण मंत्रालयीन पातळीवर निस्तरण्याचा प्रयत्न झाला.
कंत्राटदाराचे जितके वजन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या मंत्रालयात होते, तितकेच वजन भाजप सरकार सत्तेत असतानादेखील असल्याचे समोर येत आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही कारवाई न करताच नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या दालनात दिनांक 17 जानेवारी 2017 रोजी बैठक झाली. या बैठकीला डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद डवले, जिल्हा प्रशासन अधिकारी श्रीमती स्नेहल विसपूते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता एस. एच. कसबे व शाखा अभियंता एम. बी. पाटील उपस्थित होते. यामध्ये डहाणू नगरपरिषदेने लोकवर्गणीची 10 टक्के रक्कम 2 कोटी 98 लक्ष 16 हजार 611 रुपये योजनेच्या स्वतंत्र बँक खात्यात भरण्यात आलेले नसल्याने काम 1 वर्ष रखडले आहे व ही बाब गंभीर असल्याची वस्तुस्थिती मान्य करण्यात आली. यावर प्रधान सचिव यांनी डहाणू नगरपरिषदेस स्वच्छ महाराष्ट्र अभियान व घनकचरा व्यवस्थापनासाठी 14 व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधितून पैसे योजनेच्या बँक खात्यात वर्ग करावे. म्हणजेच योजनेच्या वाढवलेल्या किंमतीसाठी डहाणू नगरपरिषने स्वच्छता अभियानाच्या कामांची अहुती दिली.
या शिवाय पाणीपुरवठा योजनेचे काम हे कंत्राटदाराला 2 कोटी 85 लाख रुपयांनी जास्त रक्कमेचे दिलेले असल्याने व हे पैसे देखील डहाणू नगरपरिषदेकडे नसल्याने वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतून डहाणू नगरपरिषदेला विविध विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी पाणीपुरवठा योजनेत वळवावा व कंत्राटदाराचे भले करावे असा निर्णय झाला.
परंतू तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी आपल्या चौकशी अहवालात या योजनेचे काम निकृष्ठ दर्जाचे व असमाधानकारक झाल्याचे आणि याच अहवालात लोकवर्गणी 13 व्या वित्त आयोगातून भरली जाण्याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झालेले असल्याने अभिजीत बांगर यांनी आपल्या कार्यकाळात (मार्च 2017 पर्यंत) 14 व्या वित्त आयोगाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील निधी पाणीपूरवठा योजनेत वळविणे टाळले होते. त्यानंतर निवडणूकीच्या आयाराम गयाराम संस्कृतीच्या राजकारणात या निधीचे काय झाले हे पालकमंत्री सावरा, खासदार वणगा आणि आमदार धनारे यांनाच ठाऊक असावे.
3 कोटी 25 लाखांच्या बगीच्याच्या भ्रष्ट्राचाराचे काय?
डहाणू नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या मावळत्या नगराध्यक्षा रमिला पाटील यांच्या कार्यकाळात आगर येथील केवळ 20 गुंठे जागेतील बगीचाचे 3 कोटी 25 लक्ष रुपये खर्चून नूतनीकरण होत आहे. (अर्थात या विकास कामाला डहाणू नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी मंजूरी दिलेली आहे.) या बगीचामध्ये आधिच झाडे आहेत. मुलांना खेळण्याची साधन सामुग्री आहे. एका बाजूने पक्क्या बांधकामाचे कुंपण आहे. उर्वरीत 3 बाजूने कुंपण बांधण्यासाठी व आत पेव्हर ब्लॉकचे पदपथ तयार करण्यासाठी जास्तीत जास्त 40 ते 50 लाख रुपये खर्चून होऊ शकेल असे काम कोट्यावधी रुपये खर्चून होत आहे. याला जबाबदार कोण आणि यातील लाभार्थी कोण हे शोधण्याचे धाडस खासदार वणगा आणि आमदार धनारे यांनी करावे अशी लोकांची अपेक्षा आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर यांनी तक्रार केल्याचे समजते. रमिला पाटील यांनी घरवापसी केली असती तर ठाकूर हे तक्रारीवर ठाम राहीले असते का? आणि आता पाटील या भाजपमध्ये सामिल झाल्यामुळे भाजप काय भुमिका घेऊ शकते? हे येणार्‍या काळात स्पष्ट होईल. (समाप्त)

comments

About Rajtantra

Scroll To Top