दिनांक 23 January 2018 वेळ 3:27 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघरमध्ये आणा! माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांची परिवहनमंत्र्यांकडे मागणी

पालघरमध्ये आणा! माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांची परिवहनमंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी
पालघर, दि. 22 : पाPRADESHIK PARIVAHAN KARYALAYलघर जिल्ह्याची निर्मिती होऊन तीन वर्ष झाली तरी पालघर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणण्यात सरकारला अपयश आल्याने येथील नागरिक, वाहन चालक-मालक यांना त्रास सहन करावा लागतोय. याकरिता तातडीने पालघरला प्रादेशिक परिवहन कार्यालय आणावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे.
जिल्हा निर्मितीनंतर पालघर येथे प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सुरू होणे आवश्यक होते. परंतु प्रशासनाने विरार येथेच कार्यालय ठेवल्याने वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राकरिता नागरिकांना विरारला हेलपाटे मारावे लागत आहेत. जिल्हा निर्मितीच्या आधीपासून नागरिकांची सोय व्हावी म्हणून पालघरमध्ये परवाने देण्याकरिता केंद्र सुरु होते. त्याद्वारे वाहनांची तपासणी होऊन परवाने दिले जात असत. मात्र काही दिवसांपूर्वी परिवहन विभागाने पासिंगचे हे केंद्र बंद केल्याने तलासरी, डहाणू, बोईसर व पालघरच्या नागरिकांना आता विरार येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंगकरिता जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असून त्यांच्या वेळेचाही अपव्यय होणार आहे. ही बाब गंभीर असून जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तातडीने हे प्रादेशिक परिवहन कार्यालय जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आणावे व पूर्वीचे पासिंग केंद्र पूर्ववत सुरु करावे, अशी मागणी माजी मंत्री गावितांनी परिवहनमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान नुकताच या प्रश्‍नावर पालघर जिल्ह्यातील हजारो रिक्षा, टमटम, टेंपोचालक व मालकांनी बंद पुकारून परिवहन विभागाच्या या निर्णयाचा निषेध केला होता.

comments

About Rajtantra

Scroll To Top