दिनांक 23 January 2018 वेळ 3:21 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » रोशनी फाऊंडेशन व कॅमलिन कंपनीतर्फे आयोजित मेगा बालचित्रकला स्पर्धा संपन्न

रोशनी फाऊंडेशन व कॅमलिन कंपनीतर्फे आयोजित मेगा बालचित्रकला स्पर्धा संपन्न

राजतंत्र न्युज नेटवर्क ROSHNI FAUNDATION
दि. 22 : मुंबईतील रोशनी फाऊंडेशन अ‍ॅन्ड चॅरिटेबल ट्रस्ट आणि कोकयो कॅमलिन लि. यांच्या वतीने रविवारी (दि. 19) डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मेगा बालचित्र कला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील आशागड, सावटा, गंजाड, कैनाड व आंबेसरी केंद्रातील विविध 24 शाळांसह संतोषी आश्रम शाळा अशा एकुण 25 शाळांतील 400 हून अधिक विद्यार्थांनी या स्पर्धेत भाग घेतला. चार वेगवेगळ्या गटात या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेसाठी लागणारे संपुर्ण साहित्य कॅमलिन कंपनीद्वारे पुरविण्यात आले. दोन भागात या स्पर्धा संपन्न होणार असुन येत्या 25 नोव्हेंबर रोजी होणार्‍या दुसर्‍या भागातील बालचित्रकला स्पर्धेत रोशनी फाऊंडेशनने दत्तक घेतलेल्या 12 शाळांतील 800 विद्यार्थ्यी सहभाग घेणार आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top