दिनांक 18 December 2017 वेळ 3:05 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा : विद्युत वाहिनीचा टॉवर कोसळला, 4 जखमी

वाडा : विद्युत वाहिनीचा टॉवर कोसळला, 4 जखमी

प्रतिनिधी WADA TOWER1
वाडा, दि. 21 : पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीच्या वतीने वापी-नवी मुंबई ते नवसारी-बोईसर मार्गावर 400 के.व्ही. या अतिउच्च दाब वाहिनीच्या निर्मितीचे काम सुरु आहे. सदर कामात खड्डे खोदून काँक्रिटीकरण करून त्यावर मनोरे (टॉवर) उभारून विद्युत तारा खेचण्याचे काम वाडा तालुक्यातील खरीवली या गावाच्या हद्दीत सुरु आहे. मात्र सोमवारी सायंकाळी पाच वाजेदरम्यान विद्युत तारा खेचताना त्यातील एक मनोरा निकृष्ठ कामामुळे अचानक कोसळला. यात मनोर्‍यावर चढून विद्युत तारा खेचणारे जमील शेख, कल्लीवादीन शेख, नाकीर शेख, सानुवाल शेख या चार कामगारांना जबर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर वाडा येथील गुरुकृपा हॉस्पिटलमधे उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेबाबत पोलिस स्टेशन अथवा तहसील कार्यालयात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झाली नसल्याने कंपनी आणि ठेकेदाराने ही घटना लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
दोन महिन्यापूर्वीच वाडा तालुक्यातील भावेघर येथे या कंपनीचा एक टॉवर कोसळला होता. त्यावेळी शेजारीच असलेल्या शेतात काम करणारे पती-पत्नी यातून थोडक्यात बचावले होते.
या घटनांनंतर भारत सरकारचा उपक्रम असलेल्या पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या निकृष्ठ कामाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. विद्युतवाहिनी सुरु होण्यापूर्वीच वारंवार अशा घटना घडू लागल्याने भविष्यात विद्युत वाहिनी सुरु झाल्यावर असा अपघात घडल्यास मोठी जीवित हानी घडू शकते. त्यामुळे शासनाने या विद्युत वहिनीच्या कामाच्या दर्जाची चौकशी करून ठेकेदारांवर कडक कारवाई करावी व निकृष्ठ असलेले हे मनोरे पाडून पुन्हा नवीन बंधावेत, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top