दिनांक 23 January 2018 वेळ 3:12 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी रोहिदास पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी रोहिदास पाटील

प्रतिनिधी
वाडा, दि. 20 : राष्ट्रवादी काँग्रेROHIDAS PATILस पक्षाच्या वाडा तालुकाध्यक्षपदी रोहिदास पाटील यांची निवड झाली असून पालघर जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा यांनी नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून पाटील हे पक्षाचे सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. पक्षनिष्ठा व दांडगा जनसंपर्क असलेल्या पाटील यांनी यापूर्वी कामगार सेलचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. विविध निवडणूकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या विजयात त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.
सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणारे पाटील सध्या वाडा तालुका कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. सन्मान प्रतिष्ठान या आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सातत्याने लोकोपयोगी कामे करण्याकडे त्यांचा कल राहिला आहे. त्यांची सामाजिक जाणीव व पक्षनिष्ठा लक्षात घेऊन त्यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापुढे पक्ष वाढीसाठी व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे पाटील यांनी निवडीनंतर सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top