दिनांक 18 December 2017 वेळ 3:09 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » विक्रमगड येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्याची आत्महत्या

विक्रमगड येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्याची आत्महत्या

प्रतिनिधीVIKRAMGAD SUICIDE
विक्रमगड, दि. 19 : विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातील अजय लाटे या 18 वर्षीय विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मॅकेनिकल पदविकेच्या दुसर्‍या वर्षाला शिक्षण घेत असलेला अजय लाटे हा शहापुर तालुक्यातील आपटे गावात रहावयास होता. शिक्षणासाठी मागील वर्षापासून तो झडपोली येथील महाविद्यालयाच्या बाजुलाच भाड्याने खोली घेऊन मित्रांबरोबर राहत होता. अजय हा अभ्यासात अतिशय हुशार होता. दहावीत 91 टक्के गुण मिळवून त्याने झडपोली येथील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमधे मॅकेनिकल डिप्लोमाला प्रवेश घेतला होता. या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात 82 टक्के गुण मिळवून तो अव्वलही आला होता. सध्या परीक्षा चालू असल्याने तो खोलीच्या परिसरात असलेल्या जागेत अभ्यासासाठी गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या मित्रांनी त्याला त्वरीत विक्रमगड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर अजयने विष प्राशन केल्याचे समोर आले. यावेळी प्रकृती अधिकच बिघडल्याने 108 नंबरच्या अम्बुलन्सने त्याला ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र तेथे त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला.
अभ्यासात अतिशय हुशार असणार्‍या अजयने विष प्राशन करून आपले जीवन संपविण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काही दिवसांपासून तो काहीसा एकांतात राहत असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. वयात येणार्‍या मुलाच्या आत्महत्येच्या अशा घटनेने पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top