दिनांक 23 January 2018 वेळ 3:23 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » आयरे गावातील गरजूंना कपडे वाटप

आयरे गावातील गरजूंना कपडे वाटप

प्रतिनिधी
जव्हार, दि. 14 : तालुक्यातील आयरे येथील छत्रपती शाहू विद्यानिकेतन या शाळेत ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू लोकांना कपडे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
mokhada2सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या प्रेरणेने शिबिरार्थी सारीका गुजराथी, स्वाती बागुल, दिपाली कदम, तुषार शिंदे, राजेंद्र सोनवणे या कार्यकर्त्यांनी महादान मोहिमेअंतर्गत देणे समाजासाठी या उपक्रमाकरिता कपडे देण्याचे आवाहन लोकांना केले होते. सामाजिक दायित्व म्हणून अनेक दात्यांनी प्रतिसाद देत नवीन आणि चांगल्या दर्जाचे कपडे जमा केले होते. या कपडे वाटपाचा कार्यक्रम रविवारी आयरे येथील शाळेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण दिग्रसकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
समाजातील शेवटच्या माणसाच्या जीवनात आनंदाचे काही क्षण निर्माण करण्याचे काम खूप मोलाचे आहे. आजच्या तरुणांमध्ये आदिवासी वंचीत घटकांविषयी आस्था असणे हे समाज बदलासाठी खूप महत्वाचे असल्याचे म्हणत अशाप्रकारे सामाजिक उपक्रम राबविणार्‍या या कार्यकर्त्यांचे दिग्रसकर यांनी कौतुक केले. यावेळी शाळेचे शिक्षक तुषार शिंदे, कमलेश पगार, सचिन भामरे, बाळासाहेब भरसट, गणपत हाके, पांडुरंग पगार, शशिकांत मगर तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top