दिनांक 18 December 2017 वेळ 3:04 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » भाजप खासदारांच्या आदर्श गावात पाण्यासाठी वणवण

भाजप खासदारांच्या आदर्श गावात पाण्यासाठी वणवण

वाडा, दि. 14 : पंतBHAJAP AADARSH GAAVप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन ते गाव आदर्श गाव बनवून तेथील जनतेच्या समस्या सुटाव्यात म्हणून खासदार आदर्श गाव योजनेला प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी वाडा तालुक्यातील गोर्‍हे हे गाव दत्तक घेतले. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून गोर्‍हे गावातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहे.
गोर्‍हे या गावाची नळ पाणीपुरवठा योजना गोर्‍हे व देवळी या दोन गावांना पाणीपुरवठा करीत असून आज जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावाला पाणीपुरवठा योजनेची मोटार नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करून गेल्या पंधरा दिवसांपासून दोन्ही गावातील पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष करून महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच गोर्‍हे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून परिसरातील 30 ते 40 गाव पाड्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्याचप्रमाणे येथे नियमित आरोग्य विषयक शिबिरे आयोजित केली जात असून दररोजच्या उपचारासाठी सुमारे शंभर सव्वाशे आबालवृद्ध व महिला रुग्ण येथे येत असतात. त्यामुळे पाण्याअभावी रुग्णांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
एकीकडे खासदार आदर्श गाव योजनेअंतर्गत विविध योजना राबविणे आवश्यक असताना पाण्यासारख्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष होत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा या गावाला जोडलेली आहे. तरी देखील पाण्यासारख्या मूलभूत समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागणे हे खासदार आदर्श गाव योजना फसल्याचेच द्योतक असल्याचे बोलले जात आहे.
==================

गावातील पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित असून गोर्‍हे ग्रामपंचायतकडे पाणीपुरवठ्या करिता अतिरिक्त मोटर असून सुद्धा त्या अगोदरच दुरुस्त करून ठेवल्या नसल्याने अशा गंभीर पाणी समस्येला नागरिकांना नाहक तोंड द्यावे लागत आहे. तरी लवकरात लवकर आमच्या गावातील पाणी समस्या सुटून सुरळीत पाणीपुरवठा सुरू व्हावा, अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी आहे.

– अनिल खिलारे, माजी उपसरपंच, गोर्‍हे.

comments

About Rajtantra

Scroll To Top