दिनांक 23 January 2018 वेळ 3:24 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विक्रमगडमध्ये गाई कत्तलखान्यात नेणार्‍यांना पकडले 4 गाई पिकअप मध्ये घालून टो करुन नेत होते

विक्रमगडमध्ये गाई कत्तलखान्यात नेणार्‍यांना पकडले 4 गाई पिकअप मध्ये घालून टो करुन नेत होते

विक्रमगड दि. 13:
विक्रमगड हा ताIMG_20171112_170043लुका व परिसर आदिवासीबहुल भाग असुन येथे शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीकरीता नांगरणी व इतर जमीन मशागतीची सर्व शेतीची कामे करण्याकरीता गुरांचा वापर केला जात असल्याने, तसेच दुग्ध व्यवसाय केला जात असल्याने येथील प्रत्येक शेतकर्‍यांकडे गाई, बैल, म्हैशी अशी गुरे पाळली जातात. ही गुरे शेतकर्‍यांच्या कूटंबातील सदस्याप्रमाणे सांभाळली जातात. मात्र तालुक्यातील विविध भागात वारंवार रात्री व मध्यरात्रीच्या सुमारास गुरे चोरुन नेण्याच्या घटना घडत आहेत.
काल सायंकाळच्या सुमारास विक्रमगड-झडपोली येथुन पिकअप गाडीमध्ये चार दुग्धता गाईना झाकुन व कुणास समजु नये म्हणुन पिकअप टोचन करुन नेली जात असतांन येथील सतर्क नागरीक केतन पाटील, पुंडलिक पाटील, महेश पाटील, विजय सांबरे, रुपेश आक्रे, जयबी सिंग, युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष मनोज खरपडे, तालुका समन्वयक नितीन सुरकर यांना संशय आल्याने त्यांनी गाडी अडवुन पाहीले असता त्यामध्ये चार गाई दिसल्या. या गाई चोरी करुन भिवंडी येथे कत्तलखान्यामध्ये कत्तलीसाठी नेल्या जात होत्या. याप्रकरणी पप्पु हर्शद बर्डी (पडघा) यांस ताब्यांत घेण्यात आले असून गुड्डू (वडवली), बालन(सापने) हे आरोपी फरार आहेत.
दरम्यान या चारही गाई श्रीरामदृष्टी गोशाळा(वाडा) येथे पाठविण्यात आल्या आहेत. यापुर्वीही विक्रमगडमधील मोह बुद्रूक येथील जमीन मालक डिसिल्वा यांचे वाडीतील गोठयातून गाय चोरीस गेली होती. मात्र तेव्हा पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. अनेक लोक चोरी झाल्यानंतर पोलीसांकडे तक्रार करण्याचे टाळत असल्याने याबाबत पोलीसांकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही. मात्र आता हे प्रकार वाढत चालल्याने लोकांच्या चिंतेत भर पडत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top