दिनांक 18 December 2017 वेळ 3:09 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » उपाययोजना करण्यात अणूऊर्जा प्रकल्प अपयशी

उपाययोजना करण्यात अणूऊर्जा प्रकल्प अपयशी

cropped-LOGO-4-Online.jpgतारापूर येथे 1969 साली देशातील पहिला अणू ऊर्जा प्रकल्प सुरु झाल्यानंतर 2005 मध्ये विस्तारित प्रकल्प 3-4 कार्यान्वित झाले. सध्या तारापूर येथून 1400 मेगावॅट अणू ऊर्जेची निर्मीती होत आहे. या अणू ऊर्जा केंद्रातून अणू ऊर्जा आयोगाने नेमून दिलेल्या मर्यादेपेक्षा खूप कमी प्रमाणात किरणोत्सर्गाचा विसर्ग होत असून यामुळे परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची बाधा अथवा आरोग्याची समस्या निर्माण होत नसल्याचा दावा एनपीसीआयएल यापूर्वी अनेकदा केला आहे. मात्र या प्रकल्पाजवळील रहिवाशांच्या आरोग्याची कालांतराने तपासणी केली असता त्यांच्यात कर्करोग अथवा अन्य गंभीर आजार झाल्याचे निष्पन्न होत आहे. त्या रुग्णांची केवळ माहिती घेतली जात असल्याचे येथील अधिकारी वारंवार सांगत असतात. परंतु प्रत्यक्षात या परिसरात कर्करोगाविषयी अधिक चिकित्सा व जागृती करण्यासाठी प्रकल्पाकडून पुरेशा उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान काही वर्षापूर्वी एका नामांकित संस्थेकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी या परिसरात कर्करोगाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असल्याचा दावा व्यवस्थापनाने केला होता. दरम्यान यासंदर्भात अणूऊर्जा प्रकल्पाच्या जनसंपर्क अधिकार्‍यांशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

comments

About Rajtantra

Scroll To Top