दिनांक 18 December 2017 वेळ 3:09 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » तारापूर: परिसरात 20 संशयीत कर्करोग रुग्ण? अणूशक्ती केंद्र परिसरात भितीचे सावट

तारापूर: परिसरात 20 संशयीत कर्करोग रुग्ण? अणूशक्ती केंद्र परिसरात भितीचे सावट

Trapurपालघर, दि. 13 : जिल्ह्यातील तारापूर अणुशक्ती केंद्रामधून किरणोत्सर्गाचा प्रसार होत नाही असा दावा अणू ऊर्जा विभाग आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआयएल) तर्फे केला जात असला तरी तारापूर गावाच्या परिसरातील 300 नागरिकांच्या केलेल्या वैद्यकीय तपासणीत सुमारे 20 कर्करोगाचे संशयीत रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षभरात तारापूर परिसरातील कॅन्सरवर उपचार घेणार्‍या 25 रुग्णांपैकी पाच नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे आली असून त्या अनुशंगाने एका संस्थेच्या माध्यमातून नागरिकांकरिता विनामूल्य कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्यानंतर ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
अभिनव जनसेवा असोशिएशन आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ते 12 नोव्हेबर दरम्यान तारापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विनामूल्य कर्करोग चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 25 वर्षा वरील स्त्री व पुरुषांची कान, नाक, घसा, रक्त, डोळे, दात, छाती, महिलांच्या स्तन व गर्भशायच्या कर्करोगासंबधी तपासणी करण्यात आली. त्यावेळी कर्करोगाच्या संशयीत रुग्णांची संख्या ही चिंताजनक असून तारापूर अणूशक्ती केंद्राच्या किरणोत्सर्गाचाच हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या कर्करोग चिकित्सा शिबिरामध्ये दररोज 60 महिला व 40 पुरुषांची तीन तज्ज्ञ डॉक्टरां कडून तपासणी केली गेली. चार तंत्रज्ञासह 16 जणांच्या टीमच्या साहाय्याने सलग तीन दिवस चाललेल्या या शिबिरामंध्ये एक्स-रे, रक्त तपासणी व इतर चाचण्या करण्यात आल्या. या तपासणी दरम्यान 15 ते 20 रुग्णांमध्ये कर्करोगासंबधी अधिक तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे समन्वयक अनुज कुमार वर्मा यांनी सांगितले. या सर्व संशयित कर्करोग रुग्णांचे रक्त तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना मुंबई येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात पुढील तपासणीसाठी बोलविण्यात येणार असून गरिबांना या ठिकाणी मोफत कर्करोगावर उपचार देण्यात येतील असेही ते म्हणाले. शिबिरा दरम्यान आमदार अमित घोडा, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, तालुका प्रमुख सुधीर तामोरे, पालघर पंचायत समितीचे उपसभापती मेघन पाटील, तारापुर पोलिस स्टेशनचे प्रभारी श्री. कुंभारे आदी मान्यवरांनी उपस्थिति दर्शवली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे, अभिनव जनसेवा असोशिएशनचे संचालक परीक्षित पाटील, रॉकी तांडेल, सामाजिक कार्यकर्ते राजेश कुटे, मनोज संखे, गणेश दवणे, वैभव मोरे, भावेश तामोरे, बशिर शेख, बाबू पिल्ले, अमित दवणे , हिमांशु निजप, नंदू नाईक, अविनाश मेहेर, प्रजोत दवणे आदींनी विशेष मेहनत घेतली.

comments

About Rajtantra

Scroll To Top